सातारा जिल्हा पुन्हा हादरला,दिवसातला दुसरा धक्का 16 रुग्ण पॉझिटीव्ह

रात्री आठ वाजता आलेल्या रिपोर्ट नुसार 4 आणि रात्री उशिरा आलेल्या रिपोर्ट नुसार 16 असे एकूण 20 जण आजच्या दिवसात पॉझिटीव्ह रिपोर्ट आले आहेत

सातारा जिल्हा पुन्हा हादरला,दिवसातला दुसरा धक्का 16 रुग्ण पॉझिटीव्ह

*16 जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह*

‍ सातारा ‍  ‍दि. 21 (जिमका) : संस्थात्मक अलगीकरणात दाखल असलेला  मुंबई येथून आलेला भीमनगर ता. कोरेगांव येथील 27 वर्षीय युवक, संस्थात्मक अलगीकरणात असलेला मायणी ता. खटाव येथील 64 वर्षीय पुरुष,‍ इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला ‍धामणी ता. पाटण येथील निकट सहवासीत 72 वर्षीय पुरुष, इंजिनिअरींग कॉलेज संस्थात्मक अलगीकरणात असलेला शामगाव, कराड येथील निकट सहवासीत 24 वर्षीय पुरुष, वरोशी ता. जावली येथील निकट सहवासीत 52  वर्षीय ‍ महिला, ‍ क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालय सातारा येथे दाखल असलेले मोजावाडी ता. खटाव येथील 53 वर्षीय पुरुष सारीचा रुग्ण,  मुंबई येथून आलेला आसेर ता. वाई येथील 50 वर्षीय पुरुष, गारवाडी ता. खटाव येथील निकट सहवासीत 21 वर्षीय महिला,  मुंबई येथून आलेला फलटण येथील 63 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेली फलटण येथील 58 वर्षीय  महिला,  रायघर ता.सातारा येथील निकट सहवासीत  26 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला कासखुर्द येथील 24 वर्षीय पुरुष, आसनगाव ता. सातारा येथील निकट सहवासीत 36 वर्षीय पुरुष, मुंबई येथून आलेला ‍निमसोड ता. खटाव येथील 20 वर्षीय व 48 वर्षीय पुरुष, खापर खैरणे मंबई येथून आलेला गावडी ता. जावली येथील 19 वर्षीय पुरुष असे एकूण 16 जणांचा अहवाल  कोरोना बाधीत आला असल्याची  माहितीजिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.