साताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली हादरले दिवसात 77 पॉझिटीव्ह

शनिवार ठरला घातवार, जिल्ह्यात दिवसभरात 77 नवीन रुग्णांची नोंद.सकाळी 40 दुपारी सहा आणि आता नवीन 31 रुग्णांची भर. कराड, सातारा, खंडाळा, जावली, खटाव, वाई, कोरेगावमध्ये वाढले रुग्ण

साताऱ्यात कोरोनाचा भूकंप 31 रुग्ण पॉझिटीव्ह, कराड,वाई,सातारा,खटाव,जावली हादरले दिवसात 77 पॉझिटीव्ह

एकाच दिवसात बाधीतांची संख्या ७७ झाल्याने  प्रशासनासह आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे. जिल्ह्यात आजअखेर २७८ बाधीतांची नोंद झाली असून त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.


सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी सकाळी 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्या धक्क्यातून जिल्हा सावरत असताना सायंकाळी आणखी सहा जणाचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्याबाबतची माहिती जिल्हावासीयांना होते न होते तोच रात्री नऊच्या सुमारास आणखी 31 पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने लोकांचा काळजाचा ठोका चुकला. एकाच दिवशी ७७ रूग्ण आढळल्याने कोरोनाचा सातारा जिल्ह्यातील उद्रेकच म्हणावा लागेल. 


रात्री नऊच्या सुमारास  आलेल्या रिपोर्टमध्ये कराड तालुक्यातील 8, वाई तालुक्यातील 8 आणि सातारा तालुक्यातील दहा जणांचा समावेश होता. परवा पाचगणीतील मृत्यू झालेल्या महिलेचाही यात समावेश आहे. त्यामुळे आज दिवसभरात ७७ रुग्ण सापडण्याचा उच्चांक झा
 
जिल्ह्यातील एकूणरुग्णांची संख्या 278 इतकी झाली.  तत्पूर्वी सायंकाळी सहाच्या सुमारास प्राप्त झालेल्या रिपोर्टमध्ये पाटण तालुक्यातील चार तर कऱ्हाड तालुक्यातील
म्हासोलीतील दोन बाधीतांचा समावेश आहे. त्यामुळे एका दिवसात जिल्ह्यात 77 बाधीत रूग्‍्‍ण सापडल्याने कोरोनाचे सावट गडद झाल्याचे स्पष्ट झाले.

जिल्ह्यात शुक्रवारी एकही बाधीत न सापडल्याने दिलास मिळाला असतानाच आज सकाळी सुमारे 77 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आरोग्य विभागासह जिल्हा हादरून गेला. यात कऱ्हाड, पाटण, फलटण, माण, सातारा, खंडाळा, वाई तालुक्यातील रूग्णांचा समावेश आहे. एकाच दिवशी 77 बाधीत रूग्ण सापडण्याची ही पहिलीच वेळ असल्याने लोकांत भितीचे वातावरण निर्माण झाले होते. सायंकाळी सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. 

बाधीतामध्ये  पाटण तालुक्यातील ढेबेवाडीतील 18 वर्षीय युवती तसेच 23 वर्षाचा युवक व 44 वर्षाची महिला, गलमेवाडी येथील 24 वर्षीय महिला तसचे कऱ्हाड तालुक्यातील म्हासोली येथील 15 वर्षाची मुलगी व 17 वर्षाचा पुरूषाचा समावेश आहे. कऱ्हाड तालुक्यातील आठ बाधितांपैकी पाच वानरवाडी येथील तर तीन शेणोली येथील एकाच कुटुंबातील आहेत. एकाच दिवसात बाधीतांची संख्या 77 झाल्याने  प्रशासनासह आरोग्य विभागही चक्रावून गेला आहे. जिल्ह्यात आजअखेर 278 बाधीतांची नोंद झाली असून त्यातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना 31 रुग्णांची  अपडेट

कराड तालुका
वानरवाडी 5 रुग्ण 
शेणोली  3 रुग्ण 

जावळी तालुका
गंवडी 1 रुग्ण 
बामणोली 2 रुग्ण 

खंडाळा तालुका
पळशी 3 रुग्ण 
अंधारी 1 रुग्ण 

महाबळेश्वर
पाचगणी एक मयत  

सातारा तालुका
चिंचणेर लिंब 1
कुस खुर्द 3

वाई तालुका
वाई 1 रुग्ण 
देगाव 1 रुग्ण 

कोरेगाव तालुका
वगराळी 1 रुग्ण 
वाघोली 1 रुग्ण 

खटाव तालुका
गोदेवाडी 3 रुग्ण 
माजावाडी 1 रुग्ण 
चिंचणी 1 रुग्ण 
खातगुन 1 रुग्ण 

पुरुष 16
महिला 15

नवीन अपडेट नुसार 31 कोरोना बाधित रुग्ण