वाई तालुक्यात कोरोनाचा भूकंप...

वाई तालुक्यात देगाव 1,आसरे 1,वासोळे 1आणि दह्याट 1 असे कोरोनोचे पॉझिटिव्ह 4 रुग्ण सापडल्याने वाई तालुक्यात हाहाकार माजला आहे...

वाई तालुक्यात कोरोनाचा भूकंप...

दौलतराव पिसाळ-वाई प्रतिनिधी दि.23

वाई तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम गावांमध्ये कोरोनो रोगाचा फैलाव गतिमान झाल्यामुळे पूर्व भागातील देगाव या गावांमध्ये एक पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. तर वाईच्या पश्चिम भागातील आसरे पाठोपाठ वासोळे पाठोपाठ दह्याढ या गावांमध्ये प्रत्येकी एक एक रुग्ण सापडल्याने वाई तालुक्यातील कोरोनो पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या चार वर पोचल्याने वाई तालुक्यात कोरोनो रोगाचा हाहाकार माजला आहे. त्यामुळे तालुक्यातील  प्रशासकीय यंत्रणा हतबल झाली आहे. 
      गेल्या अडीच महिन्यांपासून वाई तालुक्यातील गावा गावांमधील गावकऱ्यांनी गावामध्ये 24 तास उभा पहारा ठेवून गावाचे रक्षण करून कोरोनो रोगाचा फैलाव थोपविण्या साठी जिवाची बाजी लावली होती. पण दुर्देवाने मुंबई-पुणे येथील रेड झोन मधील नागरिक आपल्या कुटुंबा समवेत गावा गावाकडे परतल्याने आज वाई तालुक्यातील गावांमध्ये त्यांच्यामार्फत कोरोनो रोगाचा फैलाव गतिमान झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे...