काळ आला होता पण.......

उंब्रज येथील कॉलेज रोडला पिंपळाची फांदी लोकांच्या अंगावर कोसळली,एकजण जखमी आठ ते दहा जण बचावले

काळ आला होता पण.......

काळ आला होता पण वेळ आली नव्हती काहीशी अशीच परिस्थिती उंब्रज ता.कराड येथील रोडवर शुक्रवार दि.२८ रोजी सकाळी ९.४५ वा दरम्यान निर्माण झाली होती.महात्मा गांधी विद्यालय, महिला महाविद्यालय महात्मा गांधी ज्युनियर कॉलेज ला जाणाऱ्या मार्गावर वर्दळीच्या वेळीच सकाळी कड..कड़-कड़ आवाज करीत महाकाय वजनाची फांदी कोसळली यावेळी काही दुचाकीस्वार, कॉलेजला जाणारी एक मुलगी आणि पादचारी नशिबाने या दुर्घटनेतुन थोडक्यात बचावले एक मुलगी तर निव्वळ नशिबाच्या जोरावर एका सेकंदाच्या फरकाने फांदी अंगावर पडता पडता वाचली परंतु दुर्दैवाने एका व्यक्तीच्या डोक्यात ही फांदी पडल्याने तो जखमी झाला आहे त्याला तात्काळ नागरिकांनी दवाखान्यात दाखल केले पण खरंच काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशीच परिस्थिती निर्माण झाली होती.

कॉलेज रोडच्या पाराजवळ हा शब्द पत्ता सांगण्यासाठी एकदम योग्य परंतु आज त्याच पाराजवळ असणारे पिंपळाचें झाड काळ बनून आले होते परंतु शेजारी असणाऱ्या मारुतीची कृपा आणि कोणालाही काहीही झाले नाही अशीच चर्चा नागरिकांच्यात होती.