जांभळीतील सहा पॉझिटीव्ह रुग्ण मृत कोरोना बधिताच्या घरातील,गावात भीतीचे वातावरण

जांभळीतील सहा पॉझिटीव्ह रुग्ण मृत कोरोना बधिताच्या घरातील,गावात भीतीचे वातावरण

 

वाई /दौलतराव पिसाळ
 
वाई तालुक्याच्या पश्चिम भागात कोरोनो सारख्या रोगाचा फैलाव गतीमान झाला असुन जांभळी गावात मुंबई वरुन आलेल्या इसमाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे त्याचा दोन दिवसा पुर्वी मृत्यू झाला होता आज त्याच घरातील सह जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यामुळे जांभळी गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे 
वाई तालुक्याच्या पश्चिम भागातील जांभळी आणी जोर खोर्यातील असणारी 40 गावे गावकर्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन गावे कोरोनो मुक्त ठेवण्यास यश प्राप्त केले होते पण या परिश्रमाला मुंबई आणी पुण्याच्या लोकांचा
ज्या ज्या  गावात शिरकाव झाला त्या त्या गावात कोरोनो सारख्या रोगाचा फैलाव गतीमान झाल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत  त्या मुळे नागरिकांन मध्ये भिंतीचे वातावरण निर्माण झाले आहे