पृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे चौकशी

काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण एका लग्न समारंभासाठी जात असताना कृष्णा कॅनॉलजवळ अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सदर अपघातात एक वृद्धा जखमी झाल्याचे समजताच त्यांनी ताफ्यातील गाडीतून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याच्या सूचना त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांना केल्या.

पृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे चौकशी

पृथ्वीराज चव्हाण यांनी अपघातग्रस्तांची केली आस्थेवाईकपणे चौकशी

जखमी वृद्धेला उपचारासाठी पाठवले रुग्णालयात : बाबांच्या कर्तव्यदक्षतेची कराडकरांसह प्रवास्यांनाही प्रचीती

कराड/प्रतिनिधी :
         माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण सोमवारी एका लग्न समारंभासाठी जात असताना कृष्णा कॅनॉलजवळ अपघात झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी तात्काळ गाड्यांचा ताफा थांबवत गाडीतून खाली उतरून संबंधितांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. सदर अपघातात एक वृद्धा जखमी झाल्याचे समजताच ताफ्यातील गाडीतून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्याच्या सूचनाही  त्यांनी त्यांच्यासोबतच्या अधिकाऱ्यांना केल्या. या घटनेतून आज त्यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रचीती कराडकर नागरिकांसह प्रवास्यांनाही आली.
           आ. पृथ्वीराज चव्हाण हे सोमवारी 25 रोजी सकाळी एका लग्न समारंभाला जात हा अपघात त्यांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी जास्त गर्दी असल्याने त्यांनी तात्काळ आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून चौकशी केली. सदर अपघातात एक वृद्धा जखमी झाल्याचे त्यांना समजताच त्यांनी स्वत: गाडीतून खाली उतरून जखमी वृद्धेची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच त्यांच्या ताफ्यातीलच एका गाडीतून जखमींना उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात हलवण्याच्या सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या. संदर्भातील एक पोस्ट त्यांनी आपल्या फेसबुक पेजवरटाकली आहे.
           या घटनेमुळे कराडकर नागरिकांसह प्रवास्यांनाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कर्तव्यदक्षतेची प्रचीती आली.