सह्याद्रि हॉस्पिलच्या एकनिष्ठ आरोग्यसेवेची तपपूर्ती

कराडमध्ये सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडने तत्पर आणि एकनिष्ठ सेवेची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवारी 10 जानेवारीपासून सुरु करण्यात आले असून ते 31 जानेवारी 2022 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे.

सह्याद्रि हॉस्पिलच्या एकनिष्ठ आरोग्यसेवेची तपपूर्ती

सह्याद्रि हॉस्पिलच्या एकनिष्ठ आरोग्यसेवेची तपपूर्ती

अविरत वैद्यकीय सेवेची 12 वर्षे पूर्ण : वर्धापन दिनानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रारंभ 

कराड/प्रतिनिधी :

          कराडमध्ये सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, कराडने तत्पर आणि एकनिष्ठ सेवेची 12 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यानिमित्ताने हॉस्पिटलच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर सोमवारी 10 जानेवारीपासून सुरु करण्यात आले असून ते 31 जानेवारी 2022 पर्यंत सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार आहे.  

        या शिबिरामध्ये मेडिसिन, अस्थिरोग, जनरल सर्जरी व स्त्रीरोग विभाग सहभागी होणार असून त्याअंतर्गत तज्ञ डॉक्टरांकडून मोफत तपासणी, सल्ला, लॅब व इतर तपासण्यांवर 30 टक्के सवलत देण्यात येणार आहे. तसेच डॉक्टरांनी सल्ला दिल्यास शस्त्रक्रियेसाठी माफक दरातील पॅकेजेसही उपलब्ध करण्यात येणार आहेत. या शिबिरात सहभागी होण्यासाठी 8806252525 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन हॉस्पिटल प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

         सह्याद्रि हॉस्पिटलच्या तपपूर्तीनिमित्त हॉस्पिटलचे व्यवस्थापक वेंकटेश मुळे म्हणाले, रूग्णालयात असलेल्या विविध बहुविभागीय सुविधा, तज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित कर्मचारी, टप्प्याटप्याने प्रस्थापित झालेल्या अद्ययावत सुविधा यशस्वीपणे राबवित आहेत. त्यामुळे सरकारी योजना (महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना) या सर्व गोष्टींमुळे गेल्या 12 वर्षांत आम्ही रूग्णांचा विश्‍वास जिंकू शकलो. अविरत सेवेमुळे संपादन झालेला हा विश्‍वास यापुढील कामासाठी आमच्याकरिता प्रेरणादायक असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

        हॉस्पिटलमध्ये आंतर रुग्णसेवेसाठी 160 बेड्सची सुविधा, प्रायव्हेट रूम्स व जनरल वॉर्ड्स, 30 बेडचा अत्याधुनिक सोयींनी युक्त आयसीयु विभाग, स्वतंत्र सर्जिकल आयसीयु, स्वतंत्र किडनी व लिव्हर ट्रान्सप्लांट विभाग, सुसज्ज व अद्ययावत 5 ऑपेरेशन थिएटर्स, स्वतंत्र हृदय शस्त्रक्रिया थिएटर, अत्याधुनिक सिलिंग माऊंटेड कॅथलॅब मशीन, वंध्यत्व उपचारांसाठी आयव्हीएफ लॅब, कॅन्सरसाठी अद्ययावत लिनिअर एक्सेलरेटर रेडिएशन मशीन, सी.टी.स्कॅन मशीन, सोनोग्राफी व मॅमोग्राफी मशीन, डायलीसीस सेवा, अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅबोरेटरी, फिजिओथेरपी सेवा, इमर्जन्सी कॅज्युल्टी विभाग, सर्व नामांकित इन्शुरन्स कंपन्यांची कॅशलेस वैद्यकीय सेवा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

         याबरोबरच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रूग्णांना मोफत उपचार सेवा दिली जाते. तसेच फिजिशियन, जनरल सर्जन,  गायनेकॉलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, बायपास सर्जन, न्यूरो व स्पाईन सर्जन, कॅन्सर सर्जन, पेडिऍट्रिशन,  रेडिओलॉजिस्ट, सांधेरोपण सर्जन, मूत्ररोगतज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट,   नेफ्रोलॉजिस्ट, लिव्हर व किडनी ट्रान्सप्लांट सर्जन, पेडिऍट्रिक कार्डिओलॉजिस्ट, नेत्ररोगतज्ञ डॉक्टर्सही हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहेत.

         सह्याद्रि हॉस्पिटलचे संचालक अमित चव्हाण म्हणाले, पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये कराड शहर हे प्रमुख वैद्यकीय केंद्रांपैकी एक केंद्र म्हणून पुढे येत असून यामध्ये सह्याद्रि हॉस्पिटलचा महत्त्वाचा वाटा आहे. सह्याद्रि हॉस्पिटलचा रूग्णांना एकाच छताखाली सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न आहे. तसेच नवीन तंत्रज्ञान आणण्याचे प्रयत्न यापुढेही सुरूच राहतील. नवीन उपक्रमांच्या बाबतीत सह्याद्रि हॉस्पिटल नेहमीच अगे्रसर राहिले असून येथील वैद्यकीय सेवेसाठी दिशादर्शक ठरत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.