विनाकारण फिरणाऱ्या साठ दुचाकी उंब्रज पोलिसांच्या ताब्यात

देशासह जिल्ह्यात सध्या संचारबंदी असून लाॅकडाउन चालु आहे.कोरोनो आजार पेशंट संख्या झपाट्याने वाढत आहे काही नागरिक विनाकारण व किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन फिरत आहेत व संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत.यासाठी उंब्रज पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून विनाकारण फिरणारी दुचाकी अथवा चारचाकी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

विनाकारण फिरणाऱ्या साठ दुचाकी उंब्रज पोलिसांच्या ताब्यात

उंब्रज/प्रतिनिधी

देशासह जिल्ह्यात सध्या संचारबंदी असून लाॅकडाउन चालु आहे.कोरोनो आजार पेशंट संख्या झपाट्याने वाढत आहे काही नागरिक विनाकारण व किरकोळ कारणासाठी वाहने घेऊन फिरत आहेत व संचारबंदीचे उल्लंघन करत आहेत.यासाठी उंब्रज पोलिसांनी कडक भूमिका घेतली असून विनाकारण फिरणारी दुचाकी अथवा चारचाकी ताब्यात घेण्याची कारवाई सुरू आहे.

विनाकारण व किरकोळ कारणावरून फिरणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करुन मोटारसायकली व चारचाकी वाहन जप्त करणे चालु आहे बुधवार दि.१ रोजी उंब्रज पोलीस स्टेशन हद्दीतील विनाकारण फिरणारे व किरकोळ कारणासाठी फिरणारे,घरापासुन किराणा दुकान जवळ असतानाही दुचाकीवर फिरणारे उंब्रज, मसुर, तारळे,चाफळ असे सगळीकडून मंगळवार आणि बुधवार असे दोन्ही दिवस मिळुन ६० दुचाकी पोलीस स्टेशन ला लाॅक डाऊन संपेपर्यंत ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी घरीच राहावे, अन्यथा कठोर कारवाई

नागरिकांना आवाहन की, कोणीही अंत्यत महत्वाचे अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये विनाकारण फिरणारे यांची मोटारसायकली जप्त करणे चालु आहे पेट्रोल पंपावर वर ही गर्दी करु नका.अत्यावश्यक वाहने सोडुन पेट्रोल देता येत नाही सर्वानी आपले व कुटुंबाचे आरोग्याचे हित लक्षात घेऊन घरी रहावे.

अजय गोरड
सहायक पोलीस निरीक्षक, उंब्रज