इंदोलीकरांनी जपली माणुसकी, नऊ कुटुंबाना दिला मायेचा आधार

इंदोली ता.कराड येथील ग्रामस्थांनी माणुसकी जपत नऊ कुटुंबातील तीस जणांना मायेचा आधार दिला.जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील काही कुटुंब रोजगाराचे निमित्ताने इंदोली येथे आली होती.परंतु लॉकडाउन मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती परंतु इंदोली ग्रामस्थांनी एकत्र येत या कुटुंबातील व्यक्तींना धान्य स्वरुपात मदत करत माणुसकी जपली.

इंदोलीकरांनी जपली माणुसकी, नऊ कुटुंबाना दिला मायेचा आधार

उंब्रज/प्रतिनिधी

इंदोली ता.कराड येथील ग्रामस्थांनी माणुसकी जपत नऊ कुटुंबातील तीस जणांना मायेचा आधार दिला.जळगांव जिल्ह्यातील चाळीसगाव येथील काही कुटुंब रोजगाराचे निमित्ताने इंदोली येथे आली होती.परंतु लॉकडाउन मुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती परंतु इंदोली ग्रामस्थांनी एकत्र येत या कुटुंबातील व्यक्तींना धान्य स्वरुपात मदत करत माणुसकी जपली

याबाबत समजलेली माहिती अशी इंदोली भुयाचीवाडी ते शिरगांव रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणारी  चाळीसगांव जि.जळगांव येथील ९ कुंटुंबातील ३० जणांना मदतीची आवश्यकता होती.गावचे अंतर इंदोली पासून ५५० किलोमीटर , लॉक डाऊन झाल्यामुळे रोजगार बंद, ९ कुटुंबात काही महिला तर ४ वर्षाची लहान मुलं, काम बंद, चूल बंद, कोणताही मार्ग नाही,अशा स्थितीत " अतिथी देवो भव " मानणार इंदोली गावांतील जागरूक नागरिक एका उदात्त हेतूने एकत्र येतात,तासाभरात आर्थिक मदत जमा होते, आणि तासाभरात त्या भुकेल्या जीवांना जीवनावश्यक वस्तूंची मदत पोहचते, आणि घाबरू नका, स्थलांतरित होऊ नका, आम्ही इथे रोजगार उपलब्ध करून देऊ याचा भरोसा देऊन उमेद वाढवतात, हे सगळं पाहिल्यावर स्थलांतरित कुटूंबियांच्या डोळ्यात येणारे अश्रू सर्वाच्याच पापण्या ओलावत होत्या,दिव्यत्वाची जेथे प्रचीती !तेथे कर माझे जुळती !!