सातारा जिल्हा १४ वर्षाखालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी शाहू स्टेडियमवर

निमंत्रित लीग स्पर्धेसाठी जिल्हा क्रिकेट असोसिएशनची तयारी

सातारा / प्रतिनिधी

निमंत्रित लीग क्रिकेट स्पर्धेच्या निवडीसाठी सातारा जिल्ह्यातील १४ वर्षाखालील मुलांची निवड चाचणी शनिवार दि.११ डिसेंबर रोजी सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असल्याची माहिती सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव केतन दोशी यांनी दिली आहे. 

सातारा जिल्ह्यातील १४ वर्षा खालील क्रिकेट खेळाडूंची निवड चाचणी शनिवार,दि.११ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे.निवड चाचणी मध्ये भाग घेऊ इच्छित असणाऱ्या पात्र खेळाडूंनी सकाळी ८.३० वा. सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर  निवड चाचणी साठी स्वतःच्या    किटसहित ,क्रिकेट गणवेशात, आधार कार्ड,जन्मदाखलाच्या पुराव्यासहीत हजर राहावे.असे आवाहन सातारा जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष निशांत गवळी यांनी केले आहे.