अक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले

अक्कलकोट तालुका पाण्याखाली

अक्कलकोट तालुक्याला दोन नद्यांनी वेढले

अक्कलकोट तालुका पाण्याखाली


अक्कलकोट/ महेश गायकवाड


गेल्या दोन दिवसांपासून सतत पडत असलेल्या पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील कुरनुर धरण ओव्हर फ्लो झाले असून धरणाचे 9 दरवाजे रात्री उघडण्यात आल्यामुळे तालुक्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. अक्कलकोट तालुक्याला सध्या दोन नद्या नी वेढले आहे. अक्कलकोट तालुक्यातुन पुढे कर्नाटक मध्ये गेलेल्या बोरी नदीला प्रचंड महापूर आला आहे तर अशीच परिस्थिती भीमा नदी ची ही झाली आहे यामुळे या दोन नद्यांच्या पाण्यामुळे अक्कलकोट तालुका पाण्याखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे

अक्कलकोट  तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना प्रशासनाने नम्र विनंतीकेली आहे की, सतर्क राहवे कारण कुरनुर  धरणाचे 9 दरवाजे उघडले गेले आहेत.
 पावसाचा जोर रात्री पासुन मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यात प्रचंड पाऊस झाल्यामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातुन अक्कलकोट तालुक्यात आलेली बोरी नदी दुथडी भरून वाहत असल्यामुळे बोरी नदीवरील सर्व गावांना सावधान तेचा इशारा प्रशासनाने दिला आहे तर काही गावांतील नागरिकांना घरे सोडून जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सर्वच भागातील नद्या नाले ओढे सर्वच वरच्या पातळीवरन वाहत आहेत. त्यामुळे सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत
आज सकाळी पुन्हा पावसाने जोर धरला असल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातुन अक्कलकोट तालुक्यात वाहणारी बोरी नदी ने अक्राळ विक्राळ रूप धारण केल्या मुळे नळदुर्ग उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे तर नळदुर्ग किल्या मधून बाहेर पडलेली बोरी नदी ने नर मादी धबधबा पुर्ण कोसळला आहे