तारळी नदीत अवैध वाळू उपशावर छापा,२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने केली कारवाई ; तीन जणांवर गुन्हा

तारळी नदीत अवैध वाळू उपशावर छापा,२७ लाखांचा मुद्देमाल जप्त
तारळी नदीत अवैध वाळू उपशावर छापा,२७ लाखांचा मुद्देमाल जप्त

उंब्रज / प्रतिनिधी

पाटण तालुक्यातील तारळे नदीपात्रात राहुडे गावच्या हद्दीत असणाऱ्या केटी जवळ जेसीबीच्या साह्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून अर्धा ब्रास वाळूसह जेसीबी,दोन ट्रँक्टर असा मिळून २७ लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याची घटना मंगळवार दि.२६ रोजी १.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.

अभिजीत विलास निकम रा.दुटाळवाडी ता.पाटण,सुनील विठ्ठल खराडे रा.खराडे वस्ती नुने ता.पाटण,अनिल आण्णासो शेडगे रा. तारळे ता.पाटण अशी गुन्हा दाखल झालेल्या संशियतांची नावे आहेत.

याबाबत अबिदा जावेद सय्यद (वय३९) वर्षे तलाठी नेमणूक तारळे राहुडे सजा ता.पाटण यांनी उंब्रज पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार, राहुडे ता.पाटण गावचे हद्दीत तारळी नदीपात्रात असणाऱ्या केटी जवळ १७ लाख रूपये किंमतीचा जेसीबी क्रमांक एम. एच.५० एल.४१६५ च्या साह्याने सुरू असणाऱ्या अवैध वाळू उपसावर महसूल विभागाने पोलिसांच्या मदतीने छापा टाकला असता नदीपात्रातील अवैध उपसलेली अर्धा ब्रास गोटी वाळू तसेच ५ लाख रूपये किंमतीचा नवीन कोरा न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर ट्रेलर तर ५ लाख रूपये किंमतीचा 
जॉनडीयर कंपनीचा एम.एच.५०सी.१३०८ ट्रॅक्टर व ट्रेलर असा मिळून सुमारे २७ लाख रूपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून तीन जणांवर उंब्रज पोलिसांत अवैध वाळू उपशा विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन तलबार करीत आहेत.