चीन : आत्महत्त्येसाठी त्याने गिळला टूथब्रश, डॉक्टरांनी तो 20 वर्षानंतर पोटातून काढला

बीजिंग -चिनमधील डॉक्टरांनी रविवारी एका रुग्णाच्या आतड्यातून टूथब्रश बाहेर काढला आहे. त्याने २० वर्षांपूर्वी आत्महत्त्या करण्यासाठी गिळला होता. गुआंगडोंग राज्यातील शेनझेन शहरातील ५१ वर्षीय ली नावाच्या रुग्णाने जाणूनबुजून एक टूथब्रश गिळला होता.त्याला एचआयव्हीग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो तणावात होता. जून महिन्यात त्याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन केेले. तेव्हा छोट्या आतड्यांत एक अजब वस्तू पाहिली. डॉक्टरांनी ली यास त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, होय, मी २० वर्षांपूर्वी एक टूथब्रश गिळला होता. तेव्हा माझा आत्महत्त्या करण्याचा विचार होता. ली यास डॉक्टर लियू यांनी सांगितले, तो टूथब्रश अनेक वर्षांपासून पोटात राहिला. हळूहळू तो आतड्यात अडकत गेला. जर त्यावर उपचार त्वरित केले नाहीत तर तो लीच्या लिव्हरमध्ये गेला असता. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today He swallowed toothbrush for suicide, doctors removed it after 20 years


 चीन : आत्महत्त्येसाठी त्याने गिळला टूथब्रश, डॉक्टरांनी तो 20 वर्षानंतर पोटातून काढला

बीजिंग -चिनमधील डॉक्टरांनी रविवारी एका रुग्णाच्या आतड्यातून टूथब्रश बाहेर काढला आहे. त्याने २० वर्षांपूर्वी आत्महत्त्या करण्यासाठी गिळला होता. गुआंगडोंग राज्यातील शेनझेन शहरातील ५१ वर्षीय ली नावाच्या रुग्णाने जाणूनबुजून एक टूथब्रश गिळला होता.


त्याला एचआयव्हीग्रस्त असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो तणावात होता. जून महिन्यात त्याच्या पोटात दुखत होते. त्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी सीटी स्कॅन केेले. तेव्हा छोट्या आतड्यांत एक अजब वस्तू पाहिली. डॉक्टरांनी ली यास त्याबद्दल विचारले असता तो म्हणाला, होय, मी २० वर्षांपूर्वी एक टूथब्रश गिळला होता. तेव्हा माझा आत्महत्त्या करण्याचा विचार होता. ली यास डॉक्टर लियू यांनी सांगितले, तो टूथब्रश अनेक वर्षांपासून पोटात राहिला. हळूहळू तो आतड्यात अडकत गेला. जर त्यावर उपचार त्वरित केले नाहीत तर तो लीच्या लिव्हरमध्ये गेला असता.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
He swallowed toothbrush for suicide, doctors removed it after 20 years