अनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई

स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत कराड पालिकेने सलग दोन वर्ष देशात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिसऱ्यांदा पालिकेला हा बहुमान मिळवून देण्यासाठी सार्वजन प्रयत्नशील आहेत. परंतु, या स्वच्छता अभियानात पालिकेच्या स्वच्छता विभागातील महिलांचा मोठा वाटा असून त्यांच्या कार्याची दखल घेत दिनेश पोरवाल व संजय ओसवाल यांनी स्वच्छता ताईंचा साडी,  मास्क, शिल्ड व वाफारा मशीन देऊन सत्कार केला. या अनोख्या सत्काराने स्वच्छता ताई भारावल्या होत्या.

अनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई
कराड : स्वच्छता ताईंंचा सत्कार करताना दिनेश पोरवाल, संजय ओसवाल यांच्यासह विजय वाटेगावकर व प्रमोद पाटील

अनोख्या सत्काराने भारावल्या स्वच्छता ताई 

दिनेश पोरवाल व संजय ओसवाल यांची संकल्पना : साडी, मास्क, शिल्ड व वाफारा मशीन देऊन केला सत्कार 

कराड/प्रतिनिधी :
           स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेत कराड पालिकेने सलग दोन वर्ष देशात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच तिसऱ्यांदा पालिकेला हा बहुमान मिळवून देण्यासाठी सार्वजन प्रयत्नशील आहेत. परंतु, या स्वच्छता अभियानात पालिकेच्या स्वच्छता विभागातील महिलांचा मोठा वाटा असून त्यांच्या कार्याची दखल घेत प्रसिद्ध उद्योजक दिनेश पोरवाल व संजय ओसवाल यांनी स्वच्छता ताईंचा साडी, मास्क, शिल्ड व वाफारा मशीन देऊन सत्कार केला. या अनोख्या सत्काराने स्वच्छता ताई भारावल्या होत्या.
         शहराला स्वच्छ, सुंदर करण्यामध्ये महत्वपूर्ण हातभार लावणाऱ्या स्वच्छता ताईंचा शनिवारी 9 रोजी हा सत्कार करण्यात आला. यावेळी नियोजन सभापती विजय वाटेगावकर, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील, राहुल चव्हाण, भारत जाधव, आरोग्य विभागाचे मुकादम संजय लादे, मुकादम युवराज भोसले उपस्थित होते.
          दरम्यान, आपल्या कामाची पोच घेत उद्योजक दिनेश पोरवाल व संजय ओसवाल यांनी साडी, मास्क, शिल्ड व वाफारा मशीन भेट देऊन केलेल्या अनोख्या सत्काराने स्वच्छता ताईंही भारावून गेल्या. या दोघांनी स्वच्छता ताईंच्या कामाप्रती कृतज्ञता दर्शवत दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीचे नागरिकांमधूनही कौतुक होत आहे. 

दक्ष कराडकर ग्रुपचे सर्व सदस्य नेहमीच सामाजिक कार्यात सहभाग घेतात. दिनेश व संजय यांनी स्वच्छता ताईंचा केलेला सत्कार खरच कौतुकास्पद आहे. स्वच्छता ताईंचा असा सत्कार प्रत्येक पेठेतील नागरिकांनी केल्यास त्यांना काम करण्याचे अजून बळ मिळेल. 
      - विजय वाटेगावकर (नियोजन सभापती, कराड नगरपालिका)