बेलवडे बुद्रूकमध्ये महिला बचत गटाकडून निर्जंतुकीकरण 

बेलवडे बुद्रूक ता. कराड  येथे महिला बचत गटाच्या सदस्यांनी गावामध्ये नुकतीच एचटीपीव्दारे निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली. भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून अध्यक्षा लक्ष्मीताई मोहिते व अन्य महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये दुसऱ्यांदा निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली आहे. 

बेलवडे बुद्रूकमध्ये महिला बचत गटाकडून निर्जंतुकीकरण 
बेलवडे बुद्रूक : निर्जंतुकीकरण औषध फवारणी करताना भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या सदस्या

कराड/प्रतिनिधी : 

          बेलवडे बुद्रूक ता. कराड  येथे महिला बचत गटाच्या सदस्यांनी गावामध्ये नुकतीच एचटीपीव्दारे निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली. भाग्यलक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून अध्यक्षा लक्ष्मीताई मोहिते व अन्य महिलांनी एकत्र येऊन गावामध्ये दुसऱ्यांदा निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली आहे. 
           या संस्थेच्या उपक्रमात कोमल मोहिते, सुशिला मंडले, कल्पना मोहिते, हिराबाई कांबळे, आक्काताई माने, वनिता मोहिते, मनिषा शिंदे, इंदूताई मोहिते, वंदना पाटील, सिंधूताई मोहिते आदी महिलांनी सक्रीय सहभाग घेतला होता. तसेच गावातील युवकांनीही त्यांना या कामात महत्वपूर्ण मदत केली.

         सध्या जिल्ह्यासह तालुक्यात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यामध्ये विशेषतः ग्रामीण भागात याचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. अशा आपत्ती काळात गावांमधील अनेक दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था, युवक स्वतःहून पुढे येत आपआपल्या परीने सहकार्य करत आहेत. त्यानुसारच बेलवडे गावातील भाग्यलक्ष्मी महिला बहुउद्देशीय संस्थेच्या महिलांनी पुढाकार घेऊन गावामध्ये ट्रॅक्टर एचटीपीव्दारे निर्जंतुकीकरणा ही फवारणी करण्यात आली. 
           सामाजिक उपक्रमांमध्ये भाग्यलक्ष्मी महिला बचत गटनेहमीच अग्रगण्य असतो. सुमारे तीन महिन्यापूर्वीही या बचत गटातर्फे संपूर्ण गावामध्ये निर्जंतुकीकरणाची औषध फवारणी करण्यात आली होती. सामाजिक बांधिलकी जोपासत बचत गटाच्या महिलांनी एकत्रित येऊन केलेल्या औषध फवारणीचे  ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.