जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार, किराणा दुकानदारांना वेळेचे बंधन सकाळी ९ ते १ ची वेळ

उंब्रज मधील किराणा दुकानदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने वेळेचे बंधन घालण्यात आले असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान चालू ठेवावीत असे नोटीस ग्रामपंचायत उंब्रज यांचे मार्फत सर्वच दुकानदारांना बजावण्यात आले आहे.तसेच जादा दराने विक्री करणाऱ्या दुकानंदारावर कारवाई करणार असल्याचे संकेत ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी दिले

जीवनावश्यक वस्तूंची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार,  किराणा दुकानदारांना वेळेचे बंधन सकाळी ९ ते १ ची वेळ

उंब्रज/प्रतिनिधी

उंब्रज मधील किराणा दुकानदारांना ग्रामपंचायतीच्या वतीने वेळेचे बंधन घालण्यात आले असून जीवनावश्यक वस्तूची दुकाने १० एप्रिल ते १४ एप्रिल दरम्यान सकाळी ९ ते दुपारी १ च्या दरम्यान चालू ठेवावीत असे नोटीस ग्रामपंचायत उंब्रज यांचे मार्फत सर्वच दुकानदारांना बजावण्यात आले आहे.

तसेच जीवनावश्यक वस्तूंची चढ्या भावाने विक्री करून नफा वसूल करणाऱ्या दुकानदारांना चाप लावण्यासाठी ग्रामपंचायत उंब्रज यांनी सर्वच जीवनावश्यक वस्तूची विक्री करताना योग्य भाव घ्यावा भरमसाठ किमतीला विक्री करताना आढळून आल्यास अथवा नागरिकांची तक्रार आल्यास अशा दुकानदारांचे परवाने रद्द करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचे उंब्रजचे ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांनी सांगितले.