शासकीय कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही- प्रांताधिकारी उत्तम दिघे

शासकीय कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही- प्रांताधिकारी उत्तम दिघे

शासकीय कर्मचाऱ्यांची हयगय खपवून घेतली जाणार नाही- प्रांताधिकारी उत्तम दिघे

उंब्रज मध्ये पुष्कळ त्रुटी आहेत,तहसीलदार, गटविकास अधिकारी यांचे सोबत २७ मे रोजी पुन्हा बैठक

प्रतिनिधी/उंब्रज
     
दैनिक प्रीतिसंगमच्या "तुम्ही जाल निघून उंब्रजकर जातील गुदमरून जाण्यापूर्वी काम करा झटून; उंब्रजकर नाव घेतील रेटून..." या बातमीची दखल घेऊन प्रांत अधिकारी यांनी उंब्रज येथे तातडीची बैठक घेतली होती. परजिल्हातून येणाऱ्या नागरिकांमुळे धोक्याची घटना वाढली आहे.त्यामुळे उंब्रजसह सर्वच ग्राम दक्षता समित्यांनी अँक्टिव्ह राहवे. पुढील पंधरा दिवस हे सर्वासाठी अंत्यत महत्वाचे असुन प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. कोरोनाची साखळी तयार होवू नये यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे त्यासाठी नागरिकांनी साथ द्यावी असे.आवाहन प्रांताधिकारी उत्तम दिघे यांनी केले.उंब्रज मध्ये नागरिकांनी बैठकी वेळी सांगितलेल्या अडचणी ऐकल्यानंतर अशा अडचणी आहेत याची कल्पना नव्हती,२७ मे रोजी उंब्रज येथे पुन्हा बैठक घेणार आहे तसेच शासकीय कर्मचाऱ्यांनी काम न केल्यास कडक कारवाईचा इशारा दिला.
   
उंब्रज ता.कराड येथील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासाठी तातडीने उपाययोजना होणे आवश्यक असुन त्या अनुषंगाने शनिवारी उंब्रज येथे तातडीने प्रशासकीय बैठक घेण्यात आली. बैठकीत विविध उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.यावेळी प्रांताअधिकारी उत्तम दिघे,  गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, सपोनि अजय गोरड, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार, सरपंच सौ. लता कांबळे, उपसरपंच अजीत जाधव, सदस्य जयवंतराव जाधव, डी.बी जाधव संग्रामसिंह पलंगे तसेच नागरिक उपस्थित होते.
     
प्रांत दिघे म्हणाले, कोरोना संसर्गजन्य आजार रोखण्यासाठी गावपातळीवर काम होणे गरजेचे आहे. यासाठी ग्रामपंचायतींना खर्चासह इतर अधिकारी मिळाले आहेत त्याचा वापर करावा. मास्क न वापरणाऱ्यांवर तसेच नियम न पाळणाऱ्या लोकांवर कारवाई करावी. कोरोनाला रोखणे ही आपल्या सर्वाची जबाबदारी आणि कर्तव्य आहे.सध्यस्थितीत पुणे मुंबई व परजिल्हातून नागरिक मोठ्या प्रमाणावर गावाकडे येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा.धोका वाढला असुन ग्रामसमितीने दक्ष राहुन अशा लोकांना क्कांरनटाईन करणे त्यांच्या इतर लोकांचा संपर्क येवू नये यासाठी जास्तीजास्त काळजी घ्यावी. तसेच कोरोना कालावधीत ग्रामसेवक, तलाठी व संबंधित आधिकाऱ्यानी इथेच राहवे तसेच तातडीच्या वेळी मदतकार्यात अडथळे येवू नयेत यासाठी काळजी घ्यावी असे आवाहन केले.
  
गटविकास अधिकारी आबासाहेब पवार म्हणाले, उंब्रज हे मोठे गाव आहे.  त्यामुळे सर्वानीच दक्षता घेणे आवश्यक आहे. वनवासमाचीत एका रुग्णामुळे ३९ जणांना कोरोना झाला या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तयार होवू नये यासाठी दक्षता घ्यावी. प्रवास करुन आलेल्या लोकांमुळे प्रमाण वाढले असुन त्या अनुषंगाने अधिक काम करावे. उंब्रज ग्रामपंचायत अधिकाऱ्यासंदर्भात तक्रारी वारंवार येत असून त्यासंदर्भात शहानिशा करून कारवाईबाबत संकेत दिले. कंटेनमेंट झोनमध्ये रोज फवारणी करावी अशा सुचना उंब्रज ग्रामपंचायतीला दिल्या. 
  
दरम्यान यावेळी ग्रामपंचायत सदस्य विजयराव जाधव यांनी उंब्रजचे ग्रामविकास अधिकारी काहीही काम करीत नाहीत. वेळेवर हजर नसतात. उंब्रजमध्ये फक्त एकदाच फवारणी झाली.  कोरोनात साधे मास्क सँनेटायझरचे वाटप केलेले नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात असल्याचे गाऱ्हाणे मांडले यास संग्रामसिंह पलंगे, प्रशांत देशमुख यांनीही दुजोरा देत कोरोना महामारीत उंब्रज ग्रामपंचायतीकडून उपाययोजना होत नसल्याचा आरोप केला. यावेळी सपोनि अजय गोरड यांनी लाँकडाऊन काळात १०० जणांवर कारवाई केल्याचे सांगितले तसेच नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीने प्रशासणास सहकार्य करावे. पोलिसांबरोबर ग्रामसमितीने कारवाईत पुढाकार घ्यावा. कोरोना रुग्णांची संख्या वाढु नये यासाठी प्रयत्न करावे.  
  
वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुंभार यांनी वनवासमाचीत पहिला रुग सापडल्यानंतर प्रशासन तेथे पोहचले. तेथे एकाचे ४० रुग्ण झाले. २०० क्कांरनटाईन करावे लागले. उंब्रजमध्ये सहा रुग्ण सापडले  आहेत. पुणे मुंबई वरुन आलेल्या १८२ लोकांची यादी आमच्याकडे आहे.त्या अनुषंगाने सर्वांनी लक्ष दिले पाहिजे असे आवाहन केले.

◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆

परगावावरून आलेल्या सर्वांना इन्स्टिट्यूट क्वारंटायन   करणे शक्य होणार नाही,काहींना होम क्वारंटायन कराव लागेल तर ज्याच्या घरी राहायला एक अथवा दोन खोल्या आहेत व घरी जास्त माणसे असतील अशा लोकांसाठी स्थानिक गाव कमिटी निर्णय घेऊन त्याना शाळेत ठेवण्याची व्यवस्था करेल त्याचे जेवणखान इत्यादी बाबी त्यांच्या घरचे पार पाडतील,संभाव्य धोका पाहता सर्वानी जागृत झाली पाहिजे,समितीने काम करायच आहे पण अडचणी येत असतील तर पोलिसांनी सांगा सक्तीने रोज स्वच्छता,फवारणी करणे गरजेचे आहे दाट वस्ती आहेत तिथे विशेष लक्ष दिले पाहिजे वस्तीत मास्क वाटप करता आले तर करावे कंटेनमेट झोनवर बारकाईने लक्ष ठेवावे तसेच सार्वजनिक स्वच्छता गृहे दररोज फवारणी करून स्वछ करावे

उत्तम दिघे
प्रांताधिकारी

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

कोरोना बधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे, ग्रामपंचायतीच्या जबाबदारी जास्त वाढल्या आहेत  
संस्थात्मक विलगीकरण क्षमता मर्यादित आहेत 
लक्षण जास्त दिसले नाहीत तर त्याला होम काँरोटाईन कराव लागेल. सदस्य व ग्रामस्थ यांच्यात चांगले  समन्वय असला पाहिजे. कारण हि लढाई सर्वाना  बरोबर घेऊन लडावी लागणार आहे.पावसाला सुरू झाला तर वाढ होण्याची शक्यता आहे .तेव्हा आताच  रोखून धरले पाहिजे.लोक पुणे मुंबई वरून  येण्याची शक्यता आहे.

आबासाहेब पवार
गट विकास अधिकारी, कराड
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆