मृत 70 वर्षीय महिलेचा अहवाल आला निगेटिव्ह, त्याबरोबर 36 अनुमानितांचे रिपोर्टही आले निगेटिव्ह ; 3 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल तर एका रुग्णावर आणखी 5 दिवस उपचार

कराड येथे काल मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

मृत 70 वर्षीय महिलेचा अहवाल  आला निगेटिव्ह,  त्याबरोबर  36 अनुमानितांचे रिपोर्टही आले निगेटिव्ह ; 3 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल तर एका रुग्णावर आणखी 5 दिवस उपचार

मृत 70 वर्षीय महिलेचा अहवाल  आला निगेटिव्ह,  त्याबरोबर  36 अनुमानितांचे रिपोर्टही आले निगेटिव्ह ;
3 नागरिक विलगीकरण कक्षात दाखल तर एका रुग्णावर आणखी 5 दिवस उपचार

सातारा दि.21 (जि.माका) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 12, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 22, उपजिल्हा रुग्णालय, कराड व फलटण येथील प्रत्येकी 1 असे एकूण 36 अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे तसेच कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे काल मृत्यु झालेल्या 70 वर्षीय महिलेचा नमुनाही निगेटिव्ह आला असल्याची माहिती  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.
  काल 20 एप्रिल रोजी रात्री उशिरा क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 3 नागरिकांना श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसर्गामुळे विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असून त्यांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तसेच येथे दाखल असणाऱ्या बाधित रुग्णाचे 14 दिवसानंतरचा एक अहवाल पॉझिटिव्ह व दुसरा अहवाल Inconclusive असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे. त्यामुळे या रुग्णावर वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार आणखी पाच दिवस उपचार व पुनर्तपासणी करुन पुढील निर्णय घेण्यात येईल, असे    डॉ.  गडीकर यांनी कळविले आहे. 
0000