मोठया घोषणा व वल्गना करण्या पलीकडे भाजपा सरकारने सत्ता काळात सर्व सामान्यांसाठी काहीही केले नाही  ; ना.बाळासाहेब पाटील

संजय चोरगे/महाबळेश्वर

महाविकास आघाडीच्या वतीने पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या महाबळेश्वर येथील प्रचार सभेत पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील भाजपवर खरमरीत टीका करताना मोठया घोषणा व वल्गना करण्या पलीकडे भाजपा सरकारने सत्ता काळात सर्व सामान्यांसाठी काहीही केले नाही .पुणे पदवीधर मतदार संघ व शिक्षक मतदार संघाच्या महाबळेश्वर येथील प्रचार सभे दरम्यान सहकार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना आव्हान केले की विरोधी पक्ष हा कावेबाज आहे त्या मुळे आपले तिन्ही पक्ष एकत्र असले तरी देखील गाफील न राहता काम करणे गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटले आहे 

महाविकास आघाडी स्थापनेनंतरची हि पहिलीच सार्वत्रिक निवडणूक असून विधान परिषदेत आवाज बुलंद करण्या साठी मतदानाची टक्केवारी वाढवली पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी एकजुटीने कामाला लागले पाहिजे. महाविकास आघाडीच्या दोन्हीही उमेदवारांना निवडून आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी केले.

यावेळी पालकमंत्री ना.बाळासाहेब पाटील आ.मकरंद (आबा) पाटील, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संचालक राजूशेठ राजपुरे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब भिलारे. शिवसेना जिल्हा प्रमुख यशवंतराव घाडगे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर प्रमुख दत्ताजी वाडकर  आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती