बाबांना इन्कम टॅक्सचे बोलावणे आले

८ ते १० दिवसात हजर व्हा

बाबांना इन्कम टॅक्सचे  बोलावणे आले

बाबांना बोलावणे आले,८ ते १० दिवसात हजर व्हा


पृथ्वीराज चव्हाण यांना इन्कम टॅक्सची नोटीस


निवडणूक afidevt मध्ये माहिती चुकीची दिली 10 वर्षात उत्त्पन्न कसे वाढले ते स्पष्ट करा 8 ते 10 दिवसात हजर राहावे.

 

गेल्या दहा वर्षांत तुमचे उत्पन्न कसे वाढले याची विचारणा इन्कम टॅक्स विभागाने माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना केली आहे.याबाबत खुलासा करण्यासाठी 8 ते 10 दिवसात इन्कम टॅक्स कार्यालयात समक्ष स्वतः हजर राहावे असे दिलेल्या नोटीसीत नमूद करण्यात आले आहे.

याबाबत पत्रकार परिषदेत बोलताना गत सहा वर्षात मोदी सरकारवर केलेल्या शाब्दिक हल्ल्याने आकसाने सदरची नोटीस पाठवली आहे काय ? अशी विचारणा केल्यावर आ.चव्हाण म्हणाले काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याचा प्रयत्न आहे.मी माझ्या नोटीसीला योग्य ते उत्तर देणार आहे.काँग्रेसच्या नेत्यांना फार पूर्वीच चौकशीच्या नोटिसा दिल्या माझा नंबर महाराष्ट्रात पहिला लागला एवढेच काय ते विशेष.या बाबत योग्य स्तरावरील सर्व माहिती संबंधित यंत्रणेला दिली जाईल अशी माहिती दिली.

ऐन दिवाळीच्या तोंडावर ही नोटीस मला पाठविण्यात आली आहे.यापूर्वी ईडीने राष्ट्रवादी  पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना ही नोटीस पाठवली होती पण ती नोटीस ईडी ला मागे घ्यावी लागली होती याची माहिती यावेळी माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली

 

सविस्तर वृत्त वाचा दै.प्रीतीसंगम मध्ये