सोलापूर येथे होम टू होम सर्व्हे करण्याचे पालकमंत्री यांचे आदेश

होम टू होम सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून हा सर्व्हे सोमवार संध्याकाळी पर्यत संपवावा असेही सांगण्यात आले आहे अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली.

सोलापूर येथे होम टू होम सर्व्हे करण्याचे पालकमंत्री यांचे आदेश

सोलापूर/प्रतिनिधी

सोलापूर प्रतिनिधी सोलापूर शहरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही चिंतेची बाब आहे. सोलापूर शहरात यापुढे कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढणार नाही यासाठी होम टू होम सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून हा सर्व्हे सोमवार संध्याकाळी पर्यत संपवावा असेही सांगण्यात आले आहे अशी माहिती सोलापूर जिल्ह्याचे नुतन पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्ता मामा भरणे यांनी दिली.

 सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनंतर तेपत्रकारांशी बोलत होते. आज सोलापूर येथे नव्याने ४ रुग्णाची भर पडली असल्याचे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की सोलापूर शहरात कोरोना कोणत्या मार्गे पसरला याचा शोध घेण्यात येत आहे सोलापूर शहरात तापुढे कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू नये यासाठी प्रसंगी जिल्हा परिषदेच्या कर्मचा-यांचा वापर करण्यासाठी सांगितले आहे.सोलापूर शहरात होम टू होम सर्व्हे करण्याचे आदेश देण्यात आले असून हा सर्व्हे सोमवार दिनांक 27 एप्रिल पर्यत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत

प्रारंभी आज सकाळी सोलापूर येथे पालक7यांचे आगमन झाले .येथे आगमन होताच त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय आणि योजना याबाबत बैठकीत आढावा घेतला आणि बैठकीत योग्य त्या सूचना व आदेश दिले .