रूई येथील दोन बेपत्ता मुलांचे  मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडल्याने खळबळ

रूई येथील दोन बेपत्ता मुलांचे  मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडल्याने खळबळ
मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी नेताना पोलिस
रूई येथील दोन बेपत्ता मुलांचे  मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडल्याने खळबळ

रूई येथील दोन बेपत्ता मुलांचे मृतदेह निरा उजव्या कालव्यात सापडल्याने  खंडाळा तालुक्यात
खळबळ ऊडाली आहे 

वाई/दौलतराव पिसाळ 

अंदोरी ता खंडाळा गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या रुई येथील प्रशांत रामचंद्र राणे यांचा ४ वर्षाचा मुलगा व अडीच वर्षाची मुलगी ही बहीण भाऊ असणारी लहान मुले शनिवारी सकाळ १२ वाजल्या पासुन बेपत्ता झाली होती या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनला होताच घटनेचे गांभीर्य ओळखून  लोणंद पोलीसांनसह फलटणचे डिवायएसपी तानाजी बरडे यांनी   घटनास्थळी भेट देऊन गेली दोन सपोनि विशाल वाईकर पोलिस फौज फाटा घेऊन रात्रन दिवस बेपत्ता मुलांचा शोध घेत होते अखेर शोध घेत असताना   आज दि. ३० रोजी सकाळी पाडेगाव हद्दीतील तुकाईनगर परिसरात निरा उजव्या कालव्यातील  पाण्यात आशिष प्रशांत राणे या चार वर्षाच्या चिमुकल्याचे मृतदेह आढळून आला. तर ऐश्वर्या हिचा चव्हाण वस्ती पिंपरे बु. गावच्या हद्दीत  या अडीच वर्षाच्या मुलीचा मृतदेह निरा उजव्या कालव्यात आढळून आला आहे

पोलिसांनी सदर दोन्ही मृतदेह स्थानिक तरुणांच्या आणी महाबळेश्वर  ट्रेकर्सच्या मदतीने पाण्याबाहेर काढुन  लोणंद पोलिसांनी दोन्ही मृतदेहांचे पंचनामा करून ते  लोणंद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदना साठी पाठवण्यात आले . अधिक तपास लोणंद चे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल वायकर, गणेश माने हे करीत आहेत या घटनेने रुई गावातील लोकांच्या मनातुन हळहळ व्यक्त होत आहे दोन्ही मुले काल दुपारी घरातुन बेपत्ता झाल्यावर या घटनेने  खंडाळा. तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली होती