माजी न्या. लोकूर फिजी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, दुसऱ्या देशात न्यायमूर्ती हाेणारे पहिले भारतीय

सुवा-सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लाेकूर यांनी साेमवारी फिजीच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. ते फिजीत अप्रवासी पॅनलचा एक भाग असतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. फिजीचे राष्ट्रपती जिओजी कानराेते यांनी कार्यकारी मुख्य न्यायाधीश कमल कुमार यांच्या उपस्थितीत न्या. लाेकुर यांना शपथ दिली. भारतीय न्यायमूर्ती दुसऱ्या देशाच्या प्रमुख न्यायालयात न्यायमूर्ती बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्या. लाेकुर यांनी जुलै १९७७ मध्ये वकिली सुरू केली हाेती. त्यांनी दिल्ली उच्चन्यायालयानंतर सर्वाेच्च न्यायालयात वकीली केली. जुलै १९९९मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गुवाहाटी व अांध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायमूर्ती हाेते. जून २०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला ते निवृत्त झाले हाेते. सर्वाेच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी १२ जानेवारी २०१८मध्ये पहिल्यांदा पत्र परिषद घेतली हाेती. त्यात न्या. लोकूर हेही होते. Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Former judge Lokur become Justice of the Supreme Court of Fiji


 माजी न्या. लोकूर फिजी सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती, दुसऱ्या देशात न्यायमूर्ती हाेणारे पहिले भारतीय

सुवा-सर्वाेच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती मदन बी लाेकूर यांनी साेमवारी फिजीच्या सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदाची शपथ घेतली. ते फिजीत अप्रवासी पॅनलचा एक भाग असतील. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा असेल. फिजीचे राष्ट्रपती जिओजी कानराेते यांनी कार्यकारी मुख्य न्यायाधीश कमल कुमार यांच्या उपस्थितीत न्या. लाेकुर यांना शपथ दिली. भारतीय न्यायमूर्ती दुसऱ्या देशाच्या प्रमुख न्यायालयात न्यायमूर्ती बनण्याची ही पहिलीच वेळ आहे. न्या. लाेकुर यांनी जुलै १९७७ मध्ये वकिली सुरू केली हाेती. त्यांनी दिल्ली उच्चन्यायालयानंतर सर्वाेच्च न्यायालयात वकीली केली. जुलै १९९९मध्ये ते उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गुवाहाटी व अांध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे ते मुख्य न्यायमूर्ती हाेते. जून २०१२ मध्ये सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. गेल्या वर्षी ३१ डिसेंबरला ते निवृत्त झाले हाेते. सर्वाेच्च न्यायालयाच्या चार न्यायमूर्तींनी १२ जानेवारी २०१८मध्ये पहिल्यांदा पत्र परिषद घेतली हाेती. त्यात न्या. लोकूर हेही होते.



Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Former judge Lokur become Justice of the Supreme Court of Fiji