Firing : अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये अज्ञाताकडून अंधाधुंद गोळीबार, 20 जणांचा मृत्यू; द्वेषामुळे हल्ला केल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय

अल पासो - अमेरिकेतील टेक्सासमध्ये अल पासोच्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळाबार करण्यात आला. या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉटच्या मते, हल्ल्यात 26 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एक हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या मते, द्वेषातून हा गोळीबार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोळीबारामुळे तीन व्यावसायिक इमारती बंद करण्यात आल्या आहेत.पोलिसांनी परिसर केला रिकामापोलिस आणि स्वाट अधिकाऱ्यांनी परिसर रिकामा करून लोकांना मॉलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सिटी पोलिसांनी सांगितले, की गोळीबार स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता करण्यात आला. यानंतर लोकांना तत्काळ हॉकिन्स आणि पूर्व गेटवे परिसरात जाण्यापासून रोखण्यात आले. वॉलमार्टच्या बाहेर हा गोळीबार सुरु झाला होता. हल्लेखोराने आत प्रवेश करताच एकच गदारोळ उडाला. दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना आपला जीव वाचवण्यसाठी धावपळ करावी लागली. जखमींना मॉलमध्ये आलेल्या लोकांनी आपल्या कारमधून रुग्णालयात दाखल केले.ट्रम्प म्हणाले - भंयकर गोळीबार, देव तुमच्यासोबत आहेअमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने ट्वीट करून या घटनेची निंदा केली आहे. त्यांनी ट्वीट केले की 'टेक्सासमध्ये भयंकर गोळीबार झाला. यात अनेक लोक मारले गेले. राज्य आणि स्थानिक अधिकारी काम करत आहेत. देव तुमच्यासोबत आहे.'Terrible shootings in ElPaso, Texas. Reports are very bad, many killed. Working with State and Local authorities, and Law Enforcement. Spoke to Governor to pledge total support of Federal Government. God be with you all!— Donald J. Trump (@realDonaldTrump) 3 August 2019 Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today Firing : Multiple people killed in Texas shooting Firing : Multiple people killed in Texas shooting Firing : Multiple people killed in Texas shooting


 Firing : अमेरिकेतील वॉलमार्ट स्टोअरमध्ये अज्ञाताकडून अंधाधुंद गोळीबार, 20 जणांचा मृत्यू; द्वेषामुळे हल्ला केल्याचा पोलिसांनी व्यक्त केला संशय

अल पासो - अमेरिकेतील टेक्सासमध्ये अल पासोच्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये गोळाबार करण्यात आला. या घटनेत 20 लोकांचा मृत्यू झाला. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉटच्या मते, हल्ल्यात 26 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एक हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या मते, द्वेषातून हा गोळीबार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. या गोळीबारामुळे तीन व्यावसायिक इमारती बंद करण्यात आल्या आहेत.

पोलिसांनी परिसर केला रिकामा

पोलिस आणि स्वाट अधिकाऱ्यांनी परिसर रिकामा करून लोकांना मॉलपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. सिटी पोलिसांनी सांगितले, की गोळीबार स्थानिक वेळेनुसार सकाळी 10 वाजता करण्यात आला. यानंतर लोकांना तत्काळ हॉकिन्स आणि पूर्व गेटवे परिसरात जाण्यापासून रोखण्यात आले. वॉलमार्टच्या बाहेर हा गोळीबार सुरु झाला होता. हल्लेखोराने आत प्रवेश करताच एकच गदारोळ उडाला. दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना आपला जीव वाचवण्यसाठी धावपळ करावी लागली. जखमींना मॉलमध्ये आलेल्या लोकांनी आपल्या कारमधून रुग्णालयात दाखल केले.

ट्रम्प म्हणाले - भंयकर गोळीबार, देव तुमच्यासोबत आहे
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्पने ट्वीट करून या घटनेची निंदा केली आहे. त्यांनी ट्वीट केले की 'टेक्सासमध्ये भयंकर गोळीबार झाला. यात अनेक लोक मारले गेले. राज्य आणि स्थानिक अधिकारी काम करत आहेत. देव तुमच्यासोबत आहे.'Download Dainik Bhaskar App to read Latest Hindi News Today
Firing : Multiple people killed in Texas shooting
Firing : Multiple people killed in Texas shooting
Firing : Multiple people killed in Texas shooting