तळबीड पोलिस ठाणे हद्दीत स्थागुशा (एलसीबी)पथकाची गुटख्यावर मोठी कारवाई

तळबीड पोलिस ठाणे हद्दीत स्थागुशा (एलसीबी)पथकाची गुटख्यावर मोठी कारवाई

तळबीड पोलिस ठाणे हद्दीत स्थागुशा (एलसीबी)पथकाची गुटख्यावर मोठी कारवाई

उंब्रज / प्रतिनिधी

उंब्रज सह परीसरात गुटखा बंदीला लागले 'ग्रहण'हे वृत्त प्रीतिसंगम ऑनलाईन ला 12 नोव्हेंबर रोजी प्रसिध्द करण्यात आले होते.याची दखल स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने घेत सदरची कारवाई केली आहे.

स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरील एका हॉटेल समोर गुटखा वाहतूक करणाऱ्या वाहनावर धाड टाकून सुमारे 3.5 लाखांचा गुटखा व व 3 लाख रुपयांचे वाहन असा मिळून 6.5 लाखांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती मिळत आहे.

सदरची कारवाई रात्री उशिरा झाली असून यामध्ये दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळत आहे.अन्न,भेसळ व औषध प्रशासनाला सदर कारवाईची माहिती पोलीस प्रशासनाने दिली असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू असल्याने अधिक माहिती मिळू शकली नाही.