जानुगडेवाडी येथे कृषीकन्यांच्या उपस्थितीत कृषीदिन साजरा

राज्यातील हरितक्रांतीचे जनक  वसंतरावजी नाईक यांची जन्मतिथी महाराष्ट्रात 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. वर्षभर शेतात घाम गाळून काळ्या मातीतून सोने पिकवणार्‍या बळीराजाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषीकन्या कु.वर्षाराणी पवार,स्नेहल बुगड,आसावरी चव्हाण,स्नेहल पाटील,दिप्ती तनपूरे ,ऐश्वर्या भोसले,शरयु घोडके,ऋजुता घोडेकर यांच्या उपस्थितीत जानुगडेवाडी ग्रामपंचायतीने मोठया उत्साहात कृषीदिन साजरा केला. 

जानुगडेवाडी येथे कृषीकन्यांच्या उपस्थितीत कृषीदिन साजरा
कृषीदिंडी, जानुगडेवाडी ता. पाटण जि. सातारा


कराड/प्रतिनिधीः-
राज्यातील हरितक्रांतीचे जनक  वसंतरावजी नाईक यांची जन्मतिथी महाराष्ट्रात 1 जुलै रोजी कृषी दिन म्हणून साजरी केली जाते. वर्षभर शेतात घाम गाळून काळ्या मातीतून सोने पिकवणार्‍या बळीराजाचा सन्मान म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो. दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय, राजमाची येथील कृषीकन्या कु.वर्षाराणी पवार,स्नेहल बुगड,आसावरी चव्हाण,स्नेहल पाटील,दिप्ती तनपूरे ,ऐश्वर्या भोसले,शरयु घोडके,ऋजुता घोडेकर यांच्या उपस्थितीत जानुगडेवाडी ग्रामपंचायतीने मोठया उत्साहात कृषीदिन साजरा केला.                             कार्यक्रमाची सुरूवात सकाळी 10 वाजता वृक्षदिंडीने करण्यात आली. जि.प.प्राथमिक शाळा जानुगडेवाडी येथील विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.पारंपरिक पद्धतीचे पेहराव केलेले चिमुकले आणि पालखी हे वृक्षदिंडीचे प्रमुख आकर्षण ठरले. सकाळी 11 वाजता वनरक्षक सुरेश सुतार यांच्या हस्ते शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. पारंपरिक शेतीसोबतच शेतकर्‍यांना आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान यांची माहिती मिळावी यासाठी कृषीकन्यांकडून कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होतेे. कृषीप्रदर्शनाचे उद्घाटन कृषी सहाय्यक संदिप डोईफोडे व प्रसाद जानुगडे यांच्या हस्ते करण्यात आले.                                                                                               कृषी प्रदर्शनात प्रामुख्याने सेंद्रिय शेती,पिकांवरील रोगांचे व्यवस्थापन,तणनाशके तसेच नवीन उपलब्ध असणारे बियाणे यांची माहिती देण्यात आली. सोबतच प्रगत तंत्रज्ञान आणि शेतकर्‍यांच्या यशोगाथा प्रोजेक्टरवर दाखवण्यात आल्या.ऊस आणि भुईमूग ही येथील महत्त्वाची पीके असून ऊसातील हुमणीचा प्रादुर्भाव नियंत्रित करणे गरजेचे आहे, यासाठी दुपारी 4 वा. कृषी सहाय्यक सतीशकुमार गोगदरे यांचे हुमणी व्यवस्थापन यावर मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले.                                                                                                                                       सदर कार्यक्रमास सरपंच सौ.रजिया आतार,उपसरपंच जयवंतराव जानुगडे, वनरक्षक सुरेश सुतार, सतीशकुमार गोगदरे (कृषी सहाय्यक), संदिप डोईफोडे (कृषी सहाय्यक), कांबळे एस.जी.(कार्यक्रम समन्वयक,मोकाशी कृषी महाविद्यालय),सौ.शामला कदम(मुख्याध्यापिका),सौ.जयललिता पाटील,सौ.मिनाक्षी बिचकर,बळवंतराव जानुगडे, भास्कर माने,सौ.विमल शेंडे आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत आणि जि.प.प्राथमिक शाळा यांच्या विशेष सहकार्यातून कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. कृषीकन्यांच्या या उपक्रमाचे सर्व ग्रामस्थांकडून भरभरून कौतुक होत आहे.