सुवर्णकाळ आणि सत्तांतर

सुवर्णकाळ आणि सत्तांतर

सुवर्णकाळ आणि सत्तांतर


1989 ला सुरू झालेला संघर्ष हा कृष्णाकाठी दोन भावांच्यात होता. सलग दहा वर्षे कारखान्याचे नेतृत्व मदनराव मोहिते यांनी केले. यावेळी कृष्णेत सुवर्णकाळ आला असे लोक म्हणत होते.कारण 1992 पासून कारखान्याने कायम सभासदांना ऊस दर चढता दिला. त्याच बरोबर कारखान्याने सुमारे 70 कोटीच्या ठेवी सभासदांच्या कडून घेवून जिल्हा बँकेत ठेवल्या. त्याचे अंदाजे व मिळालेल्या माहितीनुसार 1 कोटी 15 लाख रूपये जिल्हा बँकेकडून घेणारा हा राज्यातील पहिला कारखाना. बहुतांशी कारखाने हे जिल्हा बँकेकडून कर्ज काढतात. भाऊंचे मार्गदर्शन आणि मदनदादांचे नेतृत्व हे या दहा वर्षात कारखान्याच्या कारभारावर होते. भाऊंनी ही संकल्पना आणून ठेवी कपात केल्या व मिळणारे व्याज सभासदांना दिले त्याला सभासद पेन्शन असे म्हटले. 1994 च्या निवडणूकीत वाढता कारखान्याचा दर हा निवडणूकीत रयत पॅनेलला फायद्याचा ठरला मात्र त्याच वेळी या निवडणूकीत सहकार पॅनेल हे आप्पांच्या नेतृत्वाखाली लढत होते. परंंतु याचे नेतृत्व डॉ. सुरेश भोसले यांच्याकडे गेले. सुरेशबाबा यांचे या निवडणुकीत आगमन झाले. आप्पांनी सुरेशबाबांना पुढे करत ही निवडणूक लढविली आणि कृष्णाकाठी डॉ. सुरेश भोसले या नव्या नेतृत्वाचा सभासदांना परिचय झाला. सुरेशबाबा अत्यंत संयमी. तर मदनदादा आक्रमक असा हा 1994 च्या निवडणूकीचा संघर्ष पहायला मिळाला. सहकार पॅनेल या निवडणूकीत अयशस्वी ठरले असले तरी आप्पांनी सुरेशबाबांची ऐन्ट्री करून आगामी काळात त्यांचे नेतृत्व पुढे आणले. 1994 च्या निवडणूकीत रयत पॅनेल पुन्हा सत्तेवर आले. मदनदादांनी भाऊंचे मार्गदर्शन घेत टनाला चार अंकी ऊसाचा दर देण्याचे कार्य केले. साधारण 1997-98 ला हा सुवर्णकाळ सभासदांना मिळाला.


1989 पासून कारखान्याच्या वार्षिक सभेत जो संघर्ष कृष्णाकाठी झाला याचा परिपाक कायम कारखान्याच्या वार्षिक सभावर राहिला. प्र्रचंड पोलिस बंदोबस्तात कृष्णेच्या वार्षिक सभा पार पडत होत्या. विरोधकही निवडणूकीपूर्वी होणार्‍या सभेला आपल्या समर्थकासह येत होते. थोडाफार गोंधळ व्हायचा अशी परिस्थिती होती. 1999 च्या निवडणूकीत सहकार पॅनेल आणि रयत पॅनेल समोरासमोर लढत असताना दहा वर्षाच्या कालखंडामध्ये कारखान्याचे केलेेले कार्य मदनदादा सभातून सांगत होेते. भाऊ ही मोठ्या सभांना उपस्थित राहत होते. त्यांचेही मार्गदर्शन सभांमधून होत होते. तर सुरेशबाबा आणि आप्पा हे ही कारखान्याच्या कारभारावर बोट ठेवू टिका करत होते. सभा गाजत होत्या. सत्ता कोणाची येणार या बाबात कृष्णाकाठी पैजा लागल्या होत्या. मात्र कारखान्याच्या कार्यक्षेत्रात येणार्‍या काही राजकीय मंडळींना मोहितेंची सत्ता अडचणीची वाटत होती. त्यामुळे पडद्याआडून काही राजकीय खेळया झाल्या. अशातच वाळवा तालुक्यातील काही उमेदवार देताना रयत पॅनेलकडून कळत -नकळत चूक झाली. या फायदा सहकार पॅनेलला झाला. ज्या उमेदवार्‍या रयत पॅनेलने नाकरल्या त्याच उमेदवारांना सहकार पॅनेलने उमेदवारी दिली. यातील उदाहणच द्यायचे झाले तर नर्ले येथे पतंगआप्पांची उमेदवारी. कार्यक्षेत्रात असलेल्या इतर कारखान्यांच्या चालकांना कृष्णेचा दर मारक ठरत होता. अशातच त्यांनी अंतर्गत एकीकरण करत रयत पॅनेल विरोधी कामाचा सुर आवळला व जो कारखाना ठेवी गोळा करून व्याजाची बिले वाटत होता. अशा कारखान्यात सत्तांतर घडविले. सलग दहा वर्षाची सत्ता उलथवून सहकार पॅनेल सत्तेवर आले. मात्र प्रचाराचा मुद्दा होता बिनपरतीच्या ठेवी. हा मुद्दा चांगलाच गाजला. व्याजाचे बिल देवूनही सभासद विसरले. आणि डॉ. सुरेश भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि आप्पांच्या मार्गदर्शनाखाली सहकार पॅनेल 1999 ला सत्तेत आले. डॉ. सुरेश भोसले कारखान्याचे चेअरमन झाले. दादांच्या नंतर कृष्णाकाठी दुसरे एक नेतृत्व उदयाला आले. डॉ. सुरेश भोसलेंचा कालखंड सुरू झाला.  आणि त्यांची पाच वर्षांची कारकीर्द संपत असतानाच ऊसावर लोकरी मावा पडला या लोकरी माव्यामुळे राज्यात बहुतांश भागातील शेतकरी अडचणीत आले होते. अशातच निवडणूका घेणे योग्य नाही असा राज्य सरकारने निर्णय घेतला. ज्या कारखान्यांच्या निवडणूका होवू घातल्या होत्या त्या 2004 च्या निवडणूका पुढे गेल्या. इथेच डॉ.सुरेशबाबांना एक वर्षाचा कालखंड वाढवून मिळाला. आणि 2005 च्या निवडणूकाला दोनाही पॅनेल सामोरे गेले...


क्रमश..