महाबळेश्वर मध्ये मुख्याध्यापकाच्या नीच कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ

महिला दिना दिवशी अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना उघडकीस

महाबळेश्वर मध्ये मुख्याध्यापकाच्या नीच कृत्यामुळे शिक्षण क्षेत्रात खळबळ

वाई / दौलतराव पिसाळ 

संपुर्ण राज्यात आजच्या  महिला दिनाच्या पुर्व संधेलाच  इयत्ता १० मध्ये शालेय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनी वर महाबळेश्वर मधील नामवंत शाळेच्या मुख्याध्यापकानेच वेळो वेळी बलात्कार केल्याची तक्रार पिडीत मुलीने महाबळेश्वर पोलिस ठाण्यात दाखल केल्याने संपुर्ण जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

सविस्तर वृत्त असे कि महाबळेश्वर या थंड हवेच्या ठिकाणी एक १५ वर्षीय मुलगी आपल्या आई वडिलांन सह राहण्यास आहे ती तेथीलच सेठ गंगाधर माखरीया या नामांकीत विद्यालयात इयत्ता १० च्या वर्गात शालेय शिक्षण घेत आहे गेल्या १५ दिवसा पासून शाळा सुरू झाल्याने हि अल्पवयीन मुलगी शाळेत शिक्षणा साठी जात होती तर तेथे मुख्याध्यापक म्हणून दिलीप रामचंद्र ठेबे वय ५० याची नेमणुक आहे या मुख्याध्यापकाने पिडीत मुलीला वेळोवेळी शाळेच्या प्रयोग शाळेत आणी हॉल मध्ये एकटीला बोलावून तु मला फार आवडते असे सांगुन अनेकदा बलात्कार केले व कुणाला काही सांगु नकोस असा दम दिल्याने पिडीत मुलगी घाबरुन गेली 
होती पण झालेल्या बलात्कारा मुळे तिला त्रास 
होत असल्याने अखेर तिने आज दि, ८ रोजी आपल्या आई वडिलांना घडला प्रकार सांगितल्याने आई वडिलांनी घटनेचे गांभीर्य ओळखून मुलीला सोबत घेऊन थेट महाबळेश्वर पोलिस ठाणे गाठुन तेथील ऊपस्थित पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली पोलिसांनी देखील घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्याध्यापक दिलिप ढेबे याच्या विरुद्ध आयपीसी ३५४,३७६ या कलमार्तगत गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड केले आहे त्याचा अधिक तपास पोलिस ऊप निरीक्षक बिंद्रीबिंद्रीय करीत आहेत    त्या मुळे महाबळेश्वर सह संपुर्ण सातारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे पाचगणी आणी महाबळेश्वर परिसरातील शाळांचा शिक्षण क्षेत्रात  उच्च दर्जा असल्याने देश परदेशातील पालक आपल्या मुलांना लाखो रुपये खर्च करुन येथे शिक्षणा साठी मुख्याध्यापक आणी शिक्षकांच्या विश्वासावर सोडुन जातात हा आज 
पर्यंतचा इतिहास आहे पण मुख्याध्यापक दिलिप ढेबेच्या या अघोरी कृत्यामुळे संपूर्ण शिक्षण क्षेत्रच कलंकित झाल्याने खळबळ ऊडाली आहे