दै प्रीतिसंगमच्या २९ मे च्या बातमीवर शिक्कामोर्तब

कृष्णाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता,माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण हे तडजोडीच्या प्रक्रियेतून स्वतःहून बाहेर

दै प्रीतिसंगमच्या २९ मे च्या बातमीवर शिक्कामोर्तब

दै प्रीतिसंगमच्या बातमीवर शिक्कामोर्तब

कृष्णाच्या निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता,माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण हे तडजोडीच्या प्रक्रियेतून स्वतःहून बाहेर

कराड / प्रतिनिधी


सातारा,सांगलीसह सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत समविचारी पक्षांनी एकत्र यावे यासाठी मागील दोन महिन्यापासून आम्ही प्रयत्न केले. मात्र या प्रयत्नांना यश आलेले नाही. रविवारी रात्री अखेरची बैठक झाली आणि यावेळी आपण या चर्चेतून बाहेर पडत असल्याचे संबंधितांना सांगितले आहे, अशी भूमिका माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केली आहे.

निवडणूक जाहीर झाल्यापासून सातारा व सांगली जिल्हे कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची रणधुमाळी सुरू झाली आहे. सत्ताधारी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलच्या विरोधात काँग्रेस समर्थक स्वर्गीय यशवंतराव मोहिते यांचे पुत्र रयत पॅनलचे सर्वेसर्वा डॉक्टर इंद्रजीत मोहिते आणि राष्ट्रवादीचे नेते संस्थापक पॅनलचे सर्वेसर्वा अविनाश मोहिते यांनी एकत्र येत आघाडी स्थापन करावी अशी भूमिका आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम आणि जिल्हा परिषद सदस्य अँड. उदयसिंह पाटील यांनी घेतली होती.