कृष्णा नाक्यावर छ. संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा

कृष्णा नाक्यावर छ. संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा

 

कराड/प्रतिनिधी :

                        येथील नगरपालिकेकडून कृष्णा नाका येथील सर्कलवर कारंजा बसविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. मात्र, तालुक्यातील समस्त शिवप्रेमी व शंभूप्रेमींची काही वर्षांपासून या ठिकाणी पालिकेने छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली होती. परंतु, त्यावर पालिकेकडून कोणतीच हालचाल करण्यात आली नसून याठिकाणी आता पाण्याचे कारंजे उभारण्याचा घाट पालिकेने घातला आहे. तो बंद करून या ठिकाणी संभाजी महाराजांचा पुतळा उभारावा, अशी मागणी समस्त शिवप्रेमी, शंभूप्रेमी व नागरिकांनी निवेदनाद्वारे मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. 

                      यावेळी स्वाती पिसाळ, मेघराज पाटील, विनोद निंबाळकर, सुहास पाटील, विकास पाटील, संतोष गायकवाड, विष्णू पाटसकर, पराग रामुगडे, राजेंद्र माने, एकनाथ बागडी, काकासाहेब जाधव यांच्यासह तालुक्यातील शिवप्रेमी व शंभूप्रेमी, नागरिक, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.