वारणा हॉटेलवर पोलिसांचा छापा दोन वेश्यासह दोघेजण ताब्यात

मलकापूर येथील वारणा हॉटेलवर पोलिसानी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन महिलांसह आणखी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केली.

वारणा हॉटेलवर पोलिसांचा छापा                                            दोन वेश्यासह दोघेजण ताब्यात


कराड/प्रतिनिधीः-
मलकापूर येथील वारणा हॉटेलवर पोलिसानी छापा टाकून वेश्या व्यवसाय करणार्‍या दोन महिलांसह आणखी दोघांना ताब्यात घेतले. ही कारवाई रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास केली. याप्रकरणी हॉटेलमालकासह मँनेजर, रूमबॉय व एक महिला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
हॉटेल मालक बिलाल पठाण, मँनेजर प्रमोद नंदकुमार सातपुते, रूमबॉय विनायक ज्ञानदेव पाटोळे व एक महिला (नाव समजू शकले नाही) अशी गुन्हा नोंद करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मलकापूर येथील वारणा हॉटेलमध्ये एका महिलेने वेश्या व्यवसाय करण्याच्या उद्देशाने दोन महिलांना आणले असल्याची माहिती पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांना मिळाली होती. त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास  हॉटेलवर छापा टाकला असता तेथे दोन महिला व अन्य दोघेजण मिळून आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून हॉटेल मालक, मँनेजर, रूमबॉय व अन्य एक महिला असे चौघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 
सदरची कारवाई पोलीस उपविभागीय नवनाथ ढवळे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक  रूपाली चव्हाण, पोलीस नाईक कोळी, चव्हाण, महिला पोलीस दडस, कांबळे, देशमुख यांनी केली. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड व पोलीस हवालदार विवेक गोवारकर करीत आहेत.