साखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा

साखर कामगार संघटनेचा सरकारला इशारा

इस्लामपूर / प्रतिनिधी

      साखर कामगारांच्या प्रश्नांवर सरकार गंभीर नाही. सरकारने साखर कामगार काय करणार आहेत? या घमेंडीत राहू नये. येत्या २८ ऑगस्टला पुणे येथील साखर आयुक्त कार्यलया वर भव्य मोर्चा काढणार असल्याचा इशारा महाराष्ट्र्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे यांनी दिला. साखर कामगारांची पगारवाढ ठरविणाऱ्या त्रिपक्षीय समितीची मुद्दत संपून ५ महिने झाले,तरी नवी समिती झाली नाही. सरकार झोपा काढतंय काय ? असा खडा सवालही त्यांनी केला.

      येथील विजया सांस्कृतिक भवन मध्ये महाराष्ट्र्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी,तसेच सांगली,कोल्हापूर,व सातारा जिल्ह्या तील कामगार युनियन प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी राज्य सरचिटणीस शंकरराव भोसले (सांगली),राज्य कार्याध्यक्ष राऊ पाटील (कोल्हापूर),राज्य उपाध्यक्ष अशोक बिराजदार (सोलापूर),डी.बी. मोहिते (सातारा),खजिनदार, रावसाहेब भोसले (कोल्हापूर),राजेंद्र तावरे (बारामती),सुरेश मोहिते,नितीन बेनकर (अकलूज) प्रामुख्याने उपस्थित होते.