वाझे प्रकरणी केंद्राचा हस्तक्षेप चुकीचाच - शंभूराज देसाई

पोलीस अधिकारी वाझे यांना अटक केली असून याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र, त्यामध्ये केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे. तो पूर्णपणे चुकीचा असून तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम आहेत.

वाझे प्रकरणी केंद्राचा हस्तक्षेप चुकीचाच - शंभूराज  देसाई

वाझे प्रकरणी केंद्राचा हस्तक्षेप चुकीचाच - शंभूराज  देसाई 

महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याची स्पष्टोक्ती : दोषी असलेल्या कुणालाही सरकार पाठीशी घालणार नाही 

कराड/प्रतिनिधी :
          मुंबई पोलीस खात्यातील अधिकारी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांचा तपास चालू आहे. मात्र, त्यामध्ये केंद्र सरकारकडून हस्तक्षेप केला जात आहे. खरंतर, यामध्ये केंद्राने हस्तक्षेप करण्याची काहीही गरज नव्हती. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याची स्पष्टोक्ती गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. 
        येथील शासकीय विश्रामगृहात रविवारी 14 रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 
        गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, मुंबई पोलीस तपासाच्या बाबतीत जगात दोन नंबरला असून त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उभे करण्याची गरज नाही. मात्र, वाझे प्रकरणासह अन्य बाबतीतही केंद्र सरकारकडून वारंवार मुंबई, महाराष्ट्र्र पोलिसांच्या तपासात हस्तक्षेप केला जातो, ही गोष्ट पुर्णतः चुकीची आहे. आमच्या पोलीसांचा तपास सुरू असून दोषी असलेल्या कुणालाही सरकार पाठीशी घालणार नसल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.