दादा, तुम्ही म्हणाल तो झेंडा घेऊ हाती !

दादा, तुम्ही म्हणाल तो झेंडा घेऊ हाती !

 

रयत'ची विधानसभेसाठी मोर्चेबांधणी : दक्षिण दिग्विजय घडवणारच, कार्यकर्त्यांचा निर्धार 

राजेंद्र मोहिते 

कराड/प्रतिनिधी : 
                        राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी आत्तापर्यंत एकनिष्ठ राहिलेल्या, पक्षाची विचारधारा जोपासलेल्या उंडाळकर घराण्याची सध्या राजकीय परवड चालू आहे. पक्षानेच त्यांच्यावर अन्याय केला असून उदयदादांना उमेदवारी देऊन उंडाळकरांना न्याय द्यावा, अशी भावना रयत संघटनेसह उंडाळकर समर्थकांमध्ये निर्माण झाली आहे. परंतु, पक्षाने त्यादृष्टीने अजूनही कौल न दिल्याने प्रसंगी दुसऱ्या पक्षाची वाट धरण्याची तयारी असल्याने दादा; तुम्ही म्हणाल तो झेंडा घेऊ हाती! अशी ठाम भूमिका संघटना, कार्यकर्त्यांनी घेतली आहे. 
                           
                        
सोशल मीडियावर 'उंडाळकर फक्त'  

सोशल मीडियावर उदयदादा उंडाळकर, रयत संघटना व उंडाळकर समर्थकांच्या अधिकृत पेजवर दादा, तुम्ही ठरवाल ते धोरण.. बांधलं ते तोरण, लढा विकासासाठी..लढा न्यायासाठी.. लढा समाजकारणासाठी..लढा सर्वसामान्यांसाठी, मी येतोय जनतेचा आशीर्वाद घ्यायला, अजून आम्ही चाल सुरू केलेली नाही..होऊ दे तुमचं..पण आम्ही खेळायला लागलो तर.. नंतर रडायचं नाही, सुर्याच्या आड एखादा ढग आला म्हणून..सुर्याचे अस्तित्व संपत नाही, लक्ष 2019 अशा, पोस्ट झळकत आहेत. 

सविस्तर वृत्तासाठी वाचा उद्याचा (रविवार 8 रोजीचा) दैनिक प्रीतिसंगम