वाई मध्ये 11 दुकानांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

वाई मध्ये 11 दुकानांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

वाई मध्ये 11 दुकानांवर पोलिसांची दंडात्मक कारवाई

वाई प्रतिनिधी / दौलतराव पिसाळ

वाई शहरातील 11 दुकान मालक चालकांवर
वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे सपोनी आशिष कांबळे यांनी दंडात्मक कारवाई करुन   करुन ३३ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याने दुकान
चालकांन मध्ये खळबळ ऊडाली आहे  दुकान चालकांनी घालून दिलेल्या नियमांचे ऊलंघन केल्याने वरील 11 दुकाने सात दिवस बंद ठेवण्याचे नोटीस देऊन कळविले आहे पोलिसांनी दिलेली माहीती अशी कि वाई शहरात  आणी  तालुक्यातील गावांन साठी जिल्हा प्रशासनाने तोंडाला मास्कचा वापर करणे आणी कोणत्याही दुकानात
वस्तूंच्या देवाण घेवाण करित असताना प्रत्येक व्यक्ती मध्ये किमान सहा फुटांचे अंतर असावे असे आदेश जिल्हाधिकारी यांनी नव्याने काढले आहेत त्यात जे दुकानदारघालून दिलेल्या नियमांचे ऊलंघन करतील अशी दुकाने सात  दिवसा साठी बंद ठेवण्याचे अधिकार आता पोलिसांना प्राप्त झाले आहेत या नवीन आलेल्या आदेशाची अंमल बजावणी करण्या साठी वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे सपोनी आशिष कांबळे व पोलिस कर्मचारी वाई शहरातील बाजार पेठांन मध्ये फिरुन कोण कोणत्या दुकानांन वर होत असलेल्या गर्दीच्या वेळी  दुकानदारांना त्यांच्यातील व ग्राहकांन  मधील ठरवुन दिलेले सहा फुटाचे अंतर आणी नाकाला व तोंडाला मास्क लावणे अशा अटी असताना देखील दुकान चालक याचे सरास ऊलंघन करुन दुकाना समोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी करुन कोरोनो सारख्या रोगाचा फैलाव होण्यास मदत करताना दिसत आहेत या होत असलेल्या गर्दीचे पोलिस यंत्रणा पुरावा म्हणून व्हिडिओ सुटींग व फोटो काढून त्या दुकान
चालकांन वर दंडात्मक कारवाई करुन ते दुकान सात दिवस बंद ठेवण्याची नोटीस बजावत आहेत काल
गुरुवारी वाईच्या बाजार पेठेत  आनंदराव खोबरे सपोनी आशिष कांबळे व पोलिस कर्मचारी यांनी फेर फटका मारुन तब्बल 11 दुकान चालकांन वर दंडात्मक कारवाई
करुन 33 हजार रुपयांचा दंड वसूल करुन त्यांना सात दिवस दुकाने बंद ठेवण्याची नोटीस बजावली असल्याने वाईच्या बाजार पेठेत खळबळ ऊडाली आहे