एकनाथषष्ठी उत्सवाला भोसलेवाडीमध्ये बुधवारपासून प्रारंभ  

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

एकनाथषष्ठी उत्सवाला भोसलेवाडीमध्ये बुधवारपासून प्रारंभ   
कै.श्री. संभाजीराव शिवाजीराव भोसले (तात्या) यांचे स्मरणार्थ बांधन्यात आलेल्या श्रीमंत सरदार गणोजीराजे भोसले महाव्दार उद्घाटन सोहळा दिनांक 23/03/2022 सकाळी.10.00 वा.

एकनाथषष्ठी उत्सवाला भोसलेवाडीमध्ये प्रारंभ

तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन 

उंब्रज / प्रतिनिधी

भोसलेवाडी ता.कराड येथील एकनाथषष्ठी उत्सवास बुधवार दि.२३ पासुन प्रारंभ होणार आहे.गुरुवार दि.२५ मार्च दरम्यान तीन दिवस साजरा होणाऱ्या या उत्सवानिमित्त भरगच्च धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.भोसलेवाडीतील या उत्सवाला २७८ वर्षाची परपंरा आहे.श्री गोपालनाथ देव ट्रस्ट, यांचे विद्यमाने श्री एकनाथ षष्ठी उत्सव सालाबादप्रमाणे भोसलेवाडी येथील श्री गोपालनाथ महाराज आसन मंदीर येथे बुधवार ते शुक्रवार दरम्यान साजरा होत असून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले असल्याची माहिती प्रसिद्ध पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

सदर सोहळ्यात गुरुनाथ दादासो घोलप मठाधिपती श्रीश्रेत्र त्रिपूटी यांचे मार्गदर्शन लाभणार असून सर्व नाथभक्तांनी या उत्सव सोहळ्यात सहभागी होवून श्रीनाथ दर्शन व कृपाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
यासाठी होणारे धार्मिक कार्यक्रमांची सुरुवात बुधवार दि.२३ सकाळी ७ वा. श्री अभिषेक , महापुजा व ध्वजारोहन होऊन  सर्व नाथभक्त व ग्रामस्थ मंडळींच्या सहभागाने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंत व नाथभक्त कै. संभाजीराव शिवाजीराव भोसले (तात्या) यांचे स्मरणार्थ बांधण्यात आलेल्या श्रीमंत सरदार गणोजीराजे भोसले महाद्वार उद्घाटन सोहळा श्रीमंत छत्रपती वृषालीराजे भोसले (अध्यक्षा - श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज सेवा धाम,सातारा)यांचे अध्यक्षतेखाली व त्रिपुटी मठाचे मठाधिपती गुरुवर्य गुरुनाथजी महाराज घोलप यांचे शुभहस्ते व मान्यवर व ग्रामस्थ मंडळ भोसलेवाडी यांचे उपस्थितीत होणार आहे.

श्री.एकनाथ षष्ठी निमित्त बुधवार दि. २३ रोजी सकाळी ११ वाजला पासून रात्री ११ पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या मध्ये सुश्राव्य कीर्तन, एकतारी भजन,जागर असे कार्यक्रम होणार आहेत. तर गुरुवार दि. २४  रोजी सकाळी ७ ते ९ यावेळेत अभिषेक व पुजा होऊन त्यानंतर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.रात्री ९ नंतर महाप्रसादाचे आयोजन केले असून या मध्ये वांग भाकरी या अनोख्या व पारंपरिक महाप्रसादाचे वाटप भोसलेवाडी ग्रामस्थांच्या वतीने भाविकांना करण्यात येणार आहे.यानंतर रात्री दहा वाजता महाराष्ट्रातील प्रसिद्ध भजन सम्राट दरबारी गायक जगन्नाथ वाडेकर व किरण भोसले यांच्या सुमधूर भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे.श्री एकनाथ षष्ठी उत्सवात निमित्त तिसऱ्या व शेवटच्या दिवशी शुक्रवार दि.२५ रोजी सकाळी ८ ते १२ दरम्यान भजन व किर्तन होणार आहे. यानंतर पारंपरिक पद्धतीने समारोप व महाप्रसादा नंतर तिन दिवसीय श्री एकनाथ षष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे.तीन दिवस अतिशय भक्तीमय वातावरणात पार पडणार्या या उत्सवाचा भाविक भक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन श्री गोपालनाथ देवस्थान ट्रस्ट व भोसलेवाडी ग्रामस्थांनी केले आहे.