कराडात विजयादशमीला शिवप्रतिष्ठानच्या दुर्गादौडची सांगता

कराड/प्रतिनिधी : 
                        कराड येथे गेल्या काही वर्षापासून शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान च्या वतीने दुर्गा माता चे आयोजन करण्यात येते मंगळवारी 8 रोजी येथील दत्त चौकातील छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ या दौडचा सांगता समारंभ संपन्न झाला. यामध्ये सर्व मतभेद, राजकारण विसरून, सर्वपक्षीय नेते, कार्यकर्त्यांनीही या समारंभास उपस्थिती लावली. 
                       यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भारती विद्यापीठाचे अध्यक्ष विश्वजित कदम, भाजपचे सरचिटणीस डॉ. अतुल भोसले, जिल्हा परिषद सदस्य उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजप  जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड उत्तरचे नेते धैर्यशील कदम, इतिहास अभ्यासक के.एन.देसाई, नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे सागर आमले, रवींद्र डोंबे, केदार डोईफोडे व धारकरी, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
                     श्रीशिवप्रतिष्ठान-हिंदुस्थानच्या वतीने गुरुवर्य संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात नवरात्रीमध्ये घटस्थापना ते विजयादशमी-दसरा या दरम्यान दुर्गमाता दौडचे आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रतिष्ठानचे हजारो धारकरी, युवक, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होतात. कराडमध्ये गेल्या काही वर्षांपासून दुर्गादौडचे आयोजन केले जाते. यामध्ये कराड शहर, उपनगरे व परिसरासह तालुक्यातील धारकरी, युवक हजारोंच्या संख्येने सहभागी होतात. 


सर्वपक्षीय नेते एकाच झेंड्याखाली 

सध्या जिल्ह्यात लोकसभा पोटनिवडणुकीसह विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आपापल्या, पक्षाच्या, उमेदवाराच्या प्रचारात व्यस्त आहेत. तसेच जाहीर सभांमधून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडायलाही सुरुवात झाली आहे. मात्र, हे सर्व नेते आपसातील मतभेद, राजकारण, हेवेदावे बाजूला ठेवून, तालुक्यातील सर्वपक्षीय नेते, कार्यकर्तेही दुर्गादौडच्या सांगता समारंभास उपस्थिती लावली. त्यामुळे दौडच्या परमपवित्र भगव्या ध्वजाखाली/झेंड्याखाली एकत्र आल्याचे अनोखे दृश्य पहावयास मिळाले.