तहसीलदारांनी केला न्यायलयाच्या आदेशाचा अवमान ; राजेंद्र चव्हाण यांचा आरोप

कालगावची दगड खाण बंद करा ;  अन्यथा उपोषण

तहसीलदारांनी केला न्यायलयाच्या आदेशाचा अवमान ; राजेंद्र चव्हाण यांचा आरोप

तहसीलदारांनी केला न्यायलयाच्या आदेशाचा अवमान ;
राजेंद्र चव्हाण यांचा आरोप

कालगावची दगड खाण बंद करा ;  अन्यथा उपोषण

कराड / प्रतिनिधी

कालगाव, ता. कराड येथील बेकायदेशीर दगड खाण उत्खननाला येथील तहसीलदार अमरदीप वाकडे पाठीशी घालत आहेत. याप्रकरणी न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान वाकडे यांनी केल्याचा आरोप भाजपाचे तालुका सरचिटणीस राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान, सदरची खाण बंद करण्याचा जिल्हाधिकारी यांचा आदेश असतानाही गेल्या दीड वर्षापासून खाण सुरूच आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा दि. 5 डिसेंबरपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा चव्हाण यांनी दिला आहे.


राजेंद्र चव्हाण म्हणाले, विलास माने, (चरेगाव, ता. कराड) यांना कालगाव ता. कराड येथे खाणपट्टा मंजूर आहे. मात्र, येथील उत्खनन करताना त्यांनी शासनाच्या अटीशतींचे उल्लंघन केल्याच्या कारणामुळे जिल्हाधिकार्‍यांनी फेबु्रवारी 2019 मध्ये खाणपट्टा रद्द केला आहे. तसेच याप्रकरणी संबंधित खाण मालकाने आरफळ पाटबंधारे उपविभाग, रेल्वे प्रशासन, वीज कंपनी आदींना खाणीपासून धोका नसल्याचे खोटे दस्ताऐवज तसेच खोटी माहिती देऊन शासनाची फसवणूक केली आहे. 

खाणपट्टा बंदीच्या विरोधात संबंधित खाण मालकाने न्यायालयात दाद मागितली असता न्यायालयाने याबाबत महसूल प्रशासनाला आपले म्हणणे देण्याबाबतचे आदेश दिले आहेत. मात्र, ते म्हणणे आजअखेर देण्यात आलेले नाही. शिवाय त्यासाठी महसूलविभागाने वकीलही दिलेला नाही. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून तहसीलदार वाकडे यांच्या आर्शीवादाने गेली दीड वर्षापासून राजरोसपणे या खाणीत बेकायदेशीर दगड उत्खनन सुरू आहे. याप्रकरणी खाण सुरू करण्याविषयी न्यायालयाने अद्याप  कोणताही आदेश दिलेला नाही, असे असतानाही बेकायदेशीर उत्खनन करून शासनाच्या कोट्यावधींच्या रॉयलटी बुडवली आहे. हे कृत्य तहसीलदार वाकडे यांना हाताशी धरून सुरू असल्याचा आरोप राजेंद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. याप्रकरणी प्रशासनाला जाग आणण्यासाठी दि. 5 डिसेंबरपासून आमरण उपोषण करत असल्याचा इशारा राजेंद्र रमेश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिला.