'त्या' हॉस्पिटल बाबत उलटसुलट चर्चांना उधाण,तळबीडचा ४३ वर्षीय व्यक्ती नक्की कोठे कोरोनाबाधित झाला.

'त्या' हॉस्पिटल बाबत उलटसुलट चर्चांना उधाण,तळबीडचा ४३ वर्षीय व्यक्ती नक्की कोठे कोरोनाबाधित झाला.

कराड / प्रतिनिधी

शनिवारी रात्री कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आलेला ४३ वर्षीय तळबीड येथील रुग्ण नेमका कसा कोरोनाबाधित झाला याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असून,रक्षाविसर्जन करण्यासाठी आलेले नातेवाईक हे पुणे,पनवेल,आणि बेंगलोर येथून आले होते तर कोरोनाबाधित व्यक्तीची मयत झालेली आई ही कराड येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलेली होती.

याबाबत स्थानिक प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पॉझिटीव्ह आलेल्या ४३ वर्षीय कोरोनाबाधित व्यक्तीच्या आईला कराड येथील एका हॉस्पिटलमध्ये पोटदुखीवरील उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान उपचार चालू असतात सदर महिला मयत झाली परंतु रक्षाविसर्जन होण्यापूर्वी मयत महिलेच्या मुलाला काही त्रास होऊ लागल्याने त्यांनी घशातील स्त्राव तपासणीसाठी दिले असता कोरोना झाल्याचे निष्पन्न झाल्याने रक्षा विसर्जन विधी रद्द करण्यात येऊन १४ जणांना क्वारं टाईन करण्यात आले.

यामुळे तळबीड मधील 'त्या' ४३ वर्षीय व्यक्तीला कोरोना संसर्ग हा कराड मधील 'त्या'रुग्णालयात झाला असल्याची चर्चा तळबीड परिसरात नागरिकांच्यात सुरू होती.यामुळे त्या रुग्णालयातील डॉक्टर,नर्स,स्टाफ सह ऍडमिट असणाऱ्या रुग्णाबाबत हॉस्पिटल प्रशासनाने काय उपाययोजना अथवा  काळजी घेतली याबाबत उलटसुलट चर्चा सुरू होत्या.