शिवडे,कोरीवळे येथे जमावबंदी व संचार बंदीचे उल्लंघन करणार्यावर गुन्हा

दुचाकीवर मोकाट फिरणाऱ्या तसेच गावात एकत्र बसणाऱ्यावर शिवडे आणि कोरिवळे संचारबंदी नियम मोडणारावर उंब्रज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत

शिवडे,कोरीवळे येथे जमावबंदी व संचार बंदीचे उल्लंघन करणार्यावर गुन्हा

उंब्रज / प्रतिनिधी

कोरोना रोगाचा संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेला संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिवडे ता.कराड येथील ६ जणांवर तर कोरीवळे ता.कराड येथील ७ जणांवर उंब्रज पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

सागर जगन्नाथ घाडगे (वय३१), रमेश द्यानु कांबळे (वय४०),अशपाक बालेखान मुल्ला  (वय४१),विठठल रंगाप्पा जाधव (वय४२), दत्तात्रय अशोक घाडगे (वय३५), प्रशांत विश्वास जाधव (वय५०)सर्व रा शिवडे ता. कराड,युवराज सुरेश निगडे (वय३२),बाळासो दादू शिंदे (वय५०),संतोष जयसिंग निकम (वय ४५),जयवंत रघूनाथ पवार (वय६०), भगवान बापू निकाळजे (वय४०),किसन हणमंत कांबळे (वय५०), प्रदिप हणमंत कांबळे (वय३५) सर्व रा कोरिवळे ता. कराड अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.