वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करा

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी दक्ष कराडकरतर्फे करण्यात आली होती. या मागणीला खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे यश आले आहे.

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करा
वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करा 

खा. श्रीनिवास पाटील यांचा प्रधान सचिवांकडे पाठपुरावा, दक्ष कराडकर'च्या मागणीला यश

कराड/प्रतिनिधी :

          येथील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेत खा. श्रीनिवास पाटील यांनी तात्काळ सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांकडे पाठपुरावा करत त्यांना कराड उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यासंदर्भात कळविले असून त्यासाठी पाटील यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. 

         सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांनी 24 डिसेंबर रोजी खा. श्रीनिवास पाटील यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात यापूर्वी डिलिव्हरी विभाग चांगल्या प्रकारे सुरु होता. त्यामुळे याविभागात वर्षभरामध्ये जवळपास 1400 ते 1500 डिलिव्हरी होत असतात. हे रुग्णालय सरकारी असून याठिकाणी निशुल्क उपचार होत असल्याने याचा शहरासह तालुक्यातील गोरगरीब नागरिकांना चांगला फायदा होतो.

       परंतु, रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ नसल्यामुळे गेल्या 10 दिवसात एकही डिलिव्हरी झालेली नाही. तसेच याठिकाणी आलेल्या महिलांना डिलीव्हरीसाठी बाहेर जाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. हे योग्य नसून यामुळे गोरगरीब लोकांना मोठा आर्थिक भुर्दंड बसत आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा सहानुभूती पूर्वक विचार करून लवकरात लवकर वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करून लोकांची होणारी गैरसोय दूर करावी, अशी मागणी सदर निवेदनाद्वारे करण्यात आली होती.

           यासंदर्भात खा. श्रीनिवास पाटील यांनी सदर विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांशी तात्काळ संपर्क साधला. तसेच त्यांच्याकडे या विषयाचा पाठपुरावा करत कराड उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञांची नेमणूक करण्यासंदर्भातही खा. पाटील यांनी त्यांना कळविले असून त्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे दक्ष कराडकर ग्रुपचे अॅडमिन सामाजिक कार्यकर्ते प्रमोद पाटील यांच्या मागणीला यश आले आहे.

         जनतेसह सर्वच सामाजिक कार्यासाठी कार्यतत्परकर्तव्यदक्ष असलेल्या खासदार श्रीनिवास पाटील यांचे शहरासह तालुक्यातील नागरिकांच्या वतीने क्ष कराडकरतर्फे आभार व्यक्त करण्यात आले. त्याचबरोबर सदर पाठपुराव्याला यश मिळून वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ कधी रुजू होणार, याकडेही सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.