कराडात राज्यातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील बंद असलेली मंदिरे तात्काळ खुली करावीत, या मागणीसाठी कराड शहर भाजपच्या वतीने शंखनाद आंदोलन करण्यात आले. तसेच याप्रसंगी मारूती बुवा मठासमोर टाळ मृदंगाचा गजरही करण्यात आला.

कराडात राज्यातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन
कराड : शंखनाद आंदोलनात सहभागी एकनाथ बागडी, विक्रम पावसकर, भाजप पदाधिकारी व मारूती बुवा मठातील वारकरी.

कराडात राज्यातील सर्व मंदीरे खुली करण्यासाठी शंखनाद आंदोलन

शहर भाजप आक्रमक : मारूती बुवा मठासमोर टाळ मृदंगाचा गजर

कराड/प्रतिनिधी

          कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील मंदिरे बंद असून काही ठिकाणी अनेक कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने तात्काळ राज्यभरातील सर्व मंदीरे दर्शनासाठी खुली करावीत, या मागणीसाठी शहराध्यक्ष एकनाथ बागडी यांच्या नेतृत्वाखाली कराड शहर भाजपतर्फे शंखनाद आंदोलन करण्यात आले.

         येथील विठ्ठल मंदीरात सोमवारी ३० रोजी सकाळी सदर शंखनाद आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी टाळमृदंगाचा गजर करत आंदोलनकर्त्यांनी येथील मारूती बुवा मठाबाहेर आंदोलन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, माजी नगरसेवक श्री पेंढारकर, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर, उमेश शिंदे, रूपेश मुळे, प्रमोद शिंदे, विवेक भोसले, सागर लादे, रूपेंद्र कदम, सागर लादे, विश्वनाथ फुटाणे, उल्हास बेंद्रे, मोहन पुरोहीत, विशाल कुलकर्णी, निखील शाह, नितीन शाह, शैलेश गोंदकर, सागर लाखे, सुहास चक्के यांच्यासह मारूती बुवा मठातील सर्व वारकरी, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

         शहराध्यक्ष बागडी म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने गेल्या पाच महिन्यात धार्मिक स्थळे बंद ठेवल्याने सर्व व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे त्यावर जगणाऱ्यांची स्थिती बिकट झाली आहे. अन्य सर्व व्यवहार सुरळीत असताना केवळ मंदीरेच बंद का आहेत? याचा जाब सरकारला विचारयाल हवा. तसेच राज्य सरकारने सर्व मंदीरे खुली करावीत, यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे राज्यभर शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कराडमध्ये शहर भाजपच्या वतीने सदर आंदोलन करण्यात आले. एकंदरीत राज्यभरातील आंदोलनांची दखल घेवून सरकारने तात्काळ सर्व मंदीर खुली करावीत, अशी आमची मागणी असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

         दरम्यान, येथील मारूती बुवा मठासमोर भाजपच्या पदाधिकारी, कार्याकार्त्यांसह मारूती बुवा मठातील वारकऱ्यांनीही सदर आंदोलनात सक्रीय सहभाग घेत मठाबाहेर टाळ मृदंगाचा गजर केला.