राममंदिराच्या शीलांन्यासासाठी महाराष्ट्रातील गड-किल्यांवरील माती व जल रवाना

श्रावण वद्य व्दितीया अर्थात ५ ऑगस्ट २०२० या दिवशी अयोध्या क्षेत्री प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अत्यंत शुभ प्रसंगी शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरवीरांच्या बलिदानाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीतील गड-दुर्गांवरील माती आणि पवित्र जलतीर्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वतीने पाठविण्यात आले आहे. 

राममंदिराच्या शीलांन्यासासाठी महाराष्ट्रातील गड-किल्यांवरील माती व जल रवाना
आचार्य श्री भास्करगिरी महाराज यांच्याकडे माती आणि जलतीर्थ देताना केदार डोईफोडे व इतर

श्रीशिवप्रतिष्ठाच्या भिडे गुरुजींची संकल्पना, पुणे विमानतळावरून धारकऱ्यांनी सुमारे ३२ गड-किल्यांवरील माती व जलतीर्थ पाठविले 

कराड/प्रतिनिधी : 

        श्रावण वद्य व्दितीया अर्थात ५ ऑगस्ट २०२० या दिवशी अयोध्या क्षेत्री प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी भव्य श्रीराममंदिराच्या शीलान्यासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अत्यंत शुभ प्रसंगी शिवरायांच्या पदस्पर्शाने आणि अनेक नरवीरांच्या बलिदानाने पावन झालेल्या सह्याद्रीच्या कुशीतील गड-दुर्गांवरील माती आणि पवित्र जलतीर्थ श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानच्या वतीने पाठविण्यात आले आहे. 

        श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील सुमारे ३२ गड-दुर्गांवरील माती आणि पवित्र जलतीर्थ देवगड पिठाचे आचार्य श्री भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते श्री क्षेत्र अयोध्याधाम येथे पाठविण्यात आले. 

         पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सोमवारी ३ रोजी ही माती आणि पवित्र जलतीर्थ पाठविण्यात आले. कराड येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे केदार डोईफोडे, प्रदीप शिवले, अविनाशबापू मरकळे, पराशर मोने आणि आदित्य मांजरे यांनी आचार्य श्री भास्करगिरी महाराजांना पवित्र माती आणि जलतीर्थ हस्तांतरित केले. 

         इस्लामी आक्रमकांनी उध्वस्त केलेल्या धर्मक्षेत्रांचा जीर्णोद्धार करण्याची भावना श्रीशिवछत्रपतींच्या चित्तांत अखेरचा श्वास घेईपर्यंत होती. म्हणूनच या मंगल प्रसंगी श्रीशिवप्रतिष्ठान हिन्दुस्थानचे संस्थापक अध्यक्ष संभाजीराव भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून शिवप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थानी उभारण्यात येणाऱ्या मंदिराच्या शीलान्यास कार्यक्रमासाठी पाठवण्यात आली आहे.