कराडच्या जवानाच्या निरोपाला लोटला जनसागर

 

कराड/प्रतिनिधी : 
          अतिरेक्यांच्या हल्ल्यात मुंढे ता. कराड येथील लायंस नायक संदीप रघुनाथ सावंत यांना नववर्षाच्या पहाटे वीरमरण आले. आज शुक्रवारी सकाळी 8 वाजता कराड येथील विजयदिवस चौकातून मुंढे या त्यांच्या गावापर्यंत शोकयात्रा काढण्यात आली. शोकयात्रेत हजारो नागरिक सहभागी झाले आहे. 
           भारतीय सैन्यदलाच्या जवानांनी विजयदिवस चौकात शहीद जवान संदीप सावंत यांना मानवंदना दिली. यावेळी उपस्थित जनसमुदयाने वीर जवान संदीप सावंत अमर रहे, जबतक सूरज चांद रहेगा, सूरज तेरा नाम रहेगा, वीर जवान तुझे सलाम अशा घोषणा दिल्या. यावेळी संपूर्ण वातावरण भावपूर्ण झाले होते. याप्रसंगी अनेकांचा उर भरून आला होता.